बार्शी तालुक्यातील नारी शिवारात सत्तर वर्षीय वृद्धांकडुण एकमेकास काठीने व चप्पलने मारहान
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारी शिवारात दोन वृद्धांनी शेतातील किरकोळ कारणावरून एकमेकांना मारहाण करून जखमी केले.परस्परविरोधी फिर्यादीवरूण दोघांवर पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Seventy year olds beat each other with sticks and slippers in Nari Shivara of Barshi taluka
पहिल्या घटनेत रामलिंग सुरवसे वय 70 रा.नारी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
#चांगदेव साकतकर, वय 70 वर्षे, रा नारी, ता बार्शी, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते शेता मध्ये घेवडा बांधत असताना गावातील रामलिंग सुरवसे व वसंत पाथरूड हे दोघेजण शेताच्या बांधाजवऴ बोलत बसलेले होते.त्यावेऴेस ते दोघे फिर्यादीच्या जवऴ आले व मागील भांडणाचा राग मनात धरून मला रामलिंग सुरवसे हा शिवीगाळ करू लागला त्यावेऴेस मी त्यांस शिवीगाळी करू नको असे म्हणत असतानाच सुरवसे यांनी तेथेच पडलेल्या बाभऴीच्या काठीने माझ्या डावे गुडघ्यावर, डावे हाताच्या कोप-यावर मारहाण करून जखमी केले .मी खाली पडलो असता त्यांने त्यांचे पायातील चप्पलीने पुन्हा माझ्या पाठीत मारहाण केली.
सुरवसे हा तेथुन शिवीगाळी करत तु माझा पुन्हा नाद केला तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवुन तेथुन निघुण गेला.पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दुस-या घटनेत तु मला भाडखोर का म्हणाला असे म्हणुन एका शेतक-यास शिवीगाळ करून काठीने कंबरेवर,पाठीवर,हातावर मारहान करुन जखमी करत तुझ्या द्राक्ष बागेच्या तान तोडुन तुझी बाग झोपवुन टाकीण अशी धमकी दिल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील नारी शिवारात घडला.
#चांगदेव बाबा साकतकर रा.नारी असे मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
#रामलिंग सुरवसे,वय 71 वर्षे,रा नारी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की ते शेतात टोमॅटोचे रोप लावण्यासाठी भोद करण्याचे काम करत होते. त्यावेळी शेता शेजारील वसंत पाथरुड हे तेथे आले व म्हणाले की तुमच्या रानातुन रोडच्या कडेने येणारे पाणी वाहत आहे.त्यामुळे तुम्ही तुमच्या शेतामध्ये येणारे पाणी रोड खोदुण नळी टाकुन दुस-या बाजुकडे पाणी वळवा. त्यावेळी सुरवसे त्यांना म्हणाले की रोडच्या पलीकडील शेतकरी भांडखोर आहे.तो आपल्याला पाणी त्याच्या बाजुला पाणी सोडु देणार नाही त्याऎवजी मी माझ्या द्रक्षोच्या बाजुच्या कडेने पाणी जाण्यासाठी चारी काढुन घेणार आहे.असे म्हणत असतांना शेताच्या रोडच्या पलीकडील शेतकरी चांगदेव साकतकर हा तेथे आला व तु मला भाडखोर का म्हणाला असे म्हणुन मोठ्याने शिवीगाळ करू लागला.
त्यावेऴेस फिर्यादी त्यांस शिवीगाळी करू नको असे म्हणत असतानाच शेताच्या बांधाच्या कडेला पडलेली वेळुची लाकडी काठी हातात घेवुन चांगदेव साकतकर याने धावत येवुन त्यांने शेतामध्ये ढकलुन देवुन त्याच्या हातातील काठीने कंबरेवर,पाठीवर,हातावर मारहान करुन जखमी केले.