June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

शेतक-यांना रब्बी पिकासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या:राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

महाराष्ट्र स्पीड न्युज

संपूर्ण बार्शी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांची कांदा, सोयाबीन,तूर झालेले नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये रब्बी पिकासाठी अनुदान देण्यात यावे अशी मागणी बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने एका लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली आहे.

Advertisement

निवेदनात म्हटले आहे की चालू खरीप हंगामात बार्शी तालुक्यात तूर ,कांदा, सोयाबीन पिकाचा पेरा वाढलेला होता.चालू वर्षी कांदा पिकाचे तर हंगामाचे सुरुवातीपासून कांद्याचे बी रोपे तयार करण्यासाठी वारंवार टाकून देखील कांदा रोपे शेतकऱ्यास लागवडीसाठी उपलब्ध झाली नव्हती. त्यातही कशीबशी काही प्रमाणात कांद्याची लागण झालेली आहे परंतु दिनांक 11 व12 ऑक्टोबर 2020 रोजी बार्शी तालुक्यात प्रचंड मोठया प्रमाणात पाऊस झाला आहे काही ठिकाणी सोयाबीन पिके पाण्यात आजही उभी आहेत काही ठिकाणी मळणीसाठी गोळा करून ठेवलेली आहेत. सोयाबीन खळ्याभोवती पाणी जमा झालेले आहे दि.11 व 12 रोजीच्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यात  आजही शेतातून पाणी वाहत आहे.यामुळे कांदा व तूर पिके पाण्यात उभी आहेत यामुळे नजीकच्या भविष्यात कांदा व तूर ही पिके शेतात सडून जाणार आहेत यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. आजरोजी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीची चौकशी होवून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000/ रुपये रब्बी पेरणीसाठी अनुदान देण्यासाठी आपले स्तरावरून राज्य सरकारकडे विनाविलंब कार्यवाही व्हावी तसेच वरील पिकाचे झालेले नुकसानीचा पिक विमा तात्काळ मिळावी.

     निवेदनावर लिगल सेलचे तालुका अध्यक्ष अॅड. हर्षवर्धन बोधले,उपसरपंच महेश चव्हाण,महिला आघाडी तालुकाध्यक्षा अॅड.सुप्रिया गुंड,अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष इब्राहिम शेख , पांडुरंग घोलप, उमेश नेवाळे आदी उपस्थित होते.

Maharashtra SPEED News,SPEED news#Maharashtra update#Maharashtra news#Maharashtra live update#Maharashtra corona#Maharashtra news#corona update#News update#Live news#Live update#latest update,Maharashtra Update,

Leave a Reply