October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राज्यातील 13 जिल्ह्यात चार दिवस बरसणार परतीचा पाऊस

पुणे

शनिवारपासून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार परतीचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केले आहे.

हे चार दिवस राज्यातील तेरा जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे.

त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत आज शनिवार पासून

13 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

उर्वरित राज्यात मात्र हलका पाऊस पडेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply