बार्शीत डॉ कुन्ताताई नारायण जगदाळे जीवन गौरव पुरस्काराचे वितरण
बार्शी ;
डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेच्या डॉ कुन्ताताई नारायण जगदाळे जीवन गौरव पुरस्काराचे वितरण उत्साहात पार पडले.श्री शिवाजी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डाॅ. बी वाय यादव अध्यक्षस्थानी होते.
यावेळी नगराध्यक्ष अँड. असिफ तांबोळी , माजी नगराध्यक्ष रमेश पाटील ,माजी शिक्षणाधिकारी सोमनाथ वैद्य, चेतन कोठारी उपस्थित होते .
प्रास्ताविकात संस्था अध्यक्ष सुरेश राऊत यांनी संस्थेची ध्येय व उद्दिष्टे याबद्दल माहिती दिली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते नऊ क्षत्रातील नऊ गुणवंतांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे,क्रीडा क्षेत्रात प्रा.डॉ.सुरेश लांडगे,साहित्य क्षेत्र- मुकुंदराज कुलकर्णी,पर्यावरण जलसंधारण क्षेत्र- मधुकर डोईफोडे कृषी क्षेत्र- सयाजी गायकवाड. सामाजिक क्षेत्र – महेश निंबाळकर .पत्रकारिता क्षेत्र- माननीय भगवान गव्हाणे, कला क्षेत्र- प्रा. विशाल गरड, वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार डाॅ. अशोक ढगे यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी मान्यवरांचा सत्कार सपत्नीक करण्यात आला. उद्घाटन भाषणात माननीय तहसीलदार शेलार यांनी संस्थेचे कौतुक केले समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी व प्रेरणा मिळण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची गरज आहे हे अधोरेखित केले .
नगराध्यक्ष तांबोळी यांनी संस्थेची वाटचाल डॉ. कर्मवीर मामांच्या विचाराला धरून कार्य करीत असल्यामुळे संस्थेतील कार्यकारी मंडळाचे अभिनंदन केले. माजी नगराध्यक्ष रमेश पाटील यांनी जीवन गौरव पुरस्कार मधील सन्माननीय सदस्यांची निवड योग्य व कौतुकास्पद आहे असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मुकुंद कुलकर्णी म्हणाले की 9 क्षेत्रातील व्यक्तींची निवड केली आहे ती निपक्षपातीपणे आहे . त्यांच्या काव्यात्मक भाषणात सुंदर कवितांसह आपले मनोगत व्यक्त करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
त्याचप्रमाणे पुरस्काराला उत्तर देताना सिल्वर जुबली चे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे यांनीही संस्थेच्या कारभाराचे कौतुक केले.
त्याचप्रमाणे अध्यक्षीय भाषणात डॉ.बी वाय यादव यांनी सर्व सत्कारमूर्ती चे कौतुक केले व त्यांच्या योग्य निवडीमुळे निश्चितच पुरस्काराचे मोल वाढेल असे सांगितले. आभार सतीश राऊत यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ माधुरी शिंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सभासद नंदन जगदाळे ,प्रा. सुनील शेळके ,बी.टी शिंदे, प्रा.श्रीपाद भंडारी, विश्वजीत वाघमारे, भरत खांडेकर, उपाध्यक्ष विजय चव्हाण ,सचिव प्रकाश इंगोले, सहसचिव संतोष गुजरे, खजिनदार शशिकांत गोडगे, रफिक बागवान ,सुभाष गोडगे,अँड काकासाहेब गुंड, रवि जगदाळे, यांनी परिश्रम घेतले.