March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

उद्यापासून मुंबई मेट्रो सुरू,ठाकरे सरकारचा निर्णय

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत आहे. १ ऑक्टोबरपासून अनलॉकच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान राज्य सरकारने गुरुवारपासून मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबई लोकल मात्र अद्यापही बंद राहणार असून प्रतिक्षा करावी लागणार आहे.

राज्य सरकारकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये ग्रंथालयं सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान राज्य सरकारकडून शाळा, महाविद्यालयं सुरु करण्यासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, शाळा, महाविद्यालयं तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसंच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार आहे.

Leave a Reply

disawar satta king