February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

ह्या तरुणाने तब्बल सात लाखांची पर्स केली परत

बार्शी प्रतिनधी : आजच्या काळात माणुसकी, नीतिमत्ता लोप पावत चालली असून माणसे पैशाच्या मागे धावत असल्याचे बोलले जात आहे. मात्र आजच्या काळात सुद्धा नीतिमत्ता जोपासणारी माणसे समाजात अद्याप शिल्लक असल्याचा प्रत्यय बार्शी येथील एका घटनेवरून आला आहे.चक्क सात लाख रुपये रोख रक्कम रक्कम असलेली पर्स बार्शी येथील एका तरुणाने प्रवासी कुटुंबातील संबंधितांना परत दिल्याचा प्रकार समोर आला. यशपाल बिडवे असे त्या प्रमाणिकपणा दाखवलेल्या तरुणाचे नाव आहे.

Advertisement

याबाबतची अधिक माहिती अशी की,  बार्शी येथील यशपाल बिडवे या तरुणाचा शहरातील भवानी पेठ भागात खाजगी प्रवासी बस प्रवासी बुकिंग करण्याचे ऑफिस आहे.ते ऑनलाईन द्वारे प्रवासी बुकिंग करतात.ते दैनंदिन कामकाज करून नेहमी प्रमाणे आपल्या घरी जात असताना अचानक त्यांना नांदेडहुण बार्शी मार्गे पुढे मुंबई कडे जात असलेल्या व खांडवी पर्यंत गेलेल्या एका खाजगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या चालकाचा फोन आला व त्यांनी बार्शी शहरातील पोस्ट चौकात त्यांच्या बसमधील एका प्रवासाची मोठी रक्कम असलेली पर्स विसरून राहिली असल्याचे सांगितले. बिडवे यांनीही वेळ न दडवता व घरा कडे न जाता सांगितलेल्या माहिती नुसार बार्शी पोस्ट चौकात जाऊन तेथे पाहणी केली.तेव्हा निर्मणुष्य रस्त्यावर तेथील बाकड्यावर पर्स असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर प्रवासी हे परंडा जि. उस्मानाबाद येथून ऑनलाइन द्वारे ट्रॅव्हल्स बुकिंग करून मुंबईकडे जात होते.

प्रवासाची पर्स घेऊन ताब्यात घेऊन बिडवे  हे खांडवी च्या दिशेने रवाना झाले. खांडवी त पोचल्यावर  सदर पर्स गडबडीत चक्क भर चौकात विसरलेल्या कुटुंबातील सदस्य चिंताग्रस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.बिडवे यांनी सदर पर्स संबंधित कुटुंबातील सदस्यांकडे सुपूर्द केली.तसेच पर्स मधील सर्व साहित्य आहे का याची खात्री करण्याची विनंती केली. संबंधित कुटुंबातील लोकांची पर्स उघडून पाहिली असता पर्स मधील सर्व रोकड व ईतर साहित्य सुस्थितीत असल्याचे दिसुन आले.सर्व रक्कम सुखरूप असल्याचे  लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी त्यांना पाच हजार रुपये बक्षीस देण्याचा प्रयत्न केला मात्र बिडवे यांनी माणुसकीचे दर्शन देत चक्क पाच हजार रुपये बक्षीसही नाकारले. बिडवे यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

disawar satta king