March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सुयशच्या विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक पहाण्यासाठीच आपण आलो; खांडके

बार्शी ; (गणेश गोडसे)

Advertisement

राज्याच्या  गुणवत्ता यादीत या शाळेचे अणेक विद्यार्थी चमकले असल्यामुळे शाळेचे  कौतुक पहाण्यासाठीच आपण आलो असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे शिक्षण सहसंचालक वैजिनाथ खांडके यांनी केले. ते बार्शी येथील सुयश विद्यालयात पाचवी व सातवी शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
@यावेळी व्यासपीठावर पुणे विभागीय उपसंचालक औदुंबर उकिरडे,सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व संस्थेचे अध्यक्ष शिवदास नलवडे,बार्शी नगरपालिका प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे,पर्यवेक्षक संजय पाटील आदी उपस्थित होते.

श्री.खांडके पुढे बोलताना म्हणाले की तुमच्या  बार्शीत फक्त आयएएस, आयपीएसलाच जास्त महत्व आहे.कोरोणा काळात या शाळेने शाळा चालु ठेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्ता दिली. आपल्या नातवंडात खेळण्याची वेळ असताना विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी संस्थापक ङप्रयत्न करत आहेत.टीव्हीवरील काय पहावे व काय पाहु नये ते पालकांनी ठरवावे.नलावडे यांनी दिलेली यशाची गोळी खाऊन जिवनात यश्स्वी व्हा.

##विभागीय उपसंचालक औदुंबर उकिरडे बोलताना म्हणाले की विभागाचे उपसंचालक म्हणुन उपस्थित राहण्याची संधी मिळाली.43 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होणे सोपे नाही.या कार्यक्रमात मला माझे बालपण आठवले.सातवीत असल्यावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सन्मान केला होता.शिवदास नलवडे यांनी बार्शीची गरज ओळखून ही शाळा सुरू केली.पुढच्या वर्षी आनखी विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करा.प्रत्येक पालकांच्या पाल्यांकडुण अपेक्षा असतात.ज्या दगडात कारागिराचे टाकीचे घाव सोसण्याची क्षमता असते तेच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. स्वतःला यश्यस्वी होणार असे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत यश मिळत नाही असेही उकिरडे म्हणाले.

प्रास्ताविकात शिवदास नलवडे यांनी शाळा स्थापनेचा उद्देश विषद करूण गुणवत्तेबाबत माहिती देत विद्यार्थ्यांची गरज ओळखून शाळा सुरू केली. हितचिंतकांनी खुप सहकार्य केले.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच शाळेची निर्मिती केली असे सांगितले.
यावेळी राजनंदिनी मिरगणे, भुवन कदम, यश गवळी,यश भोळे,सिद्धी गुढे,ईश्वरी गिराम,रितेश देवरे,
मधुरा गाडेकर आदी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थी  शंतनु पवार,संजिवनी चौधरी, गौरी बरडे यांनी मनोगत व्यक्त केले.

  यावेळी गजानन देशपांडे,विजयालक्ष्मी सुरवसे,अक्षय मोकाशी,वैभव धर्मे, मुठाळ,बोराडे,पवार,भोसले,तोडकरी, सुपेकर मॅडम आडगळे,पाचकवडे, सावंत मॅडम

सुत्रसंचालन वैभव धर्मे व भाग्यश्री सुपेकर यांनी केले.आभार राऊत यांनी मानले.

Leave a Reply