December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दहा ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद मागे,मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मराठा नेत्यांची घोषणा

मुंबई : मराठा आंदोलकांनी 10 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे (Maharashtra Bandh Postponed By Maratha Leaders). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर मराठा नेत्यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली (Maharashtra Bandh Postponed By Maratha Leaders).

Advertisement

‘कोल्हापूर येथे गोलमेज परिषद घेऊन 12 मागण्यांचे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भरती बंद करा, अशी मागणी आज बैठकीत केली. आमच्या विविध मागण्या आहेत. सरकार त्याबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे 10 तारखेला पुकारलेला बंद आम्ही तात्पुरता स्थगित करत आहोत’, अशी माहिती संघर्ष आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी दिली.

10 तारखेला महाराष्ट्र बंद पुकारला होता. त्यासाठी 50 संघटना एकत्र आल्या होत्या. सरकारने मराठा समाजासाठी 223 कोटी रुपयांची तरतूद केली होती. आज आम्हाला ईडब्ल्यू आरक्षण आणि त्याच्या सवलती दिल्या आहेत. मात्र, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठत नाही, तोपर्यंत नोकर भरती सुरु करु नका अशी मागणी आम्ही केली. त्यावर सर्व मंत्र्यांनी, लीगल तज्ञांनी, दोन प्रलंबित एका महिन्यात मार्गी लावले जातील, असे या बैठकीत सांगितले. एक अपेक्स बॉडी तयार केली जाईल त्यात ही बॉडी निर्णय घेईल. त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष समितीचे राज्य बंद करण्याचे 10 तारखेचे आंदोलन स्थगित करत आहे’, असंही ते म्हणाले.

‘अनेक संघटना वेगवेगळे आंदोलन करतात, आम्ही कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद घेतली. त्यात आम्ही 10 तारखेला बंदचा ईशारा दिला होता. मात्र, सरकारसोबतची चर्चा सकारात्मक झाली’, असं वंदना मोरे यांनी सांगितलं.

Leave a Reply