June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

साहित्य संमेलन राज्यासाठी आदर्श,बार्शीतील साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे उद्गार

कर्मवीर डाॅ मामासाहेब जगदाळे साहित्य नगरी,बार्शी ( गणेश गोडसे)

Advertisement

खैरवसारख्या ग्रामीण भागात साहित्य संमेलन सुरू करूण  फुलचंद जावळे यांनी महाराष्ट्राला आदर्श दिला असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष राजा माने यांनी केले.ते बार्शी येथीलयशवंतरावचव्हाणसांस्कृतिकसभागृहात आजपासून सुरू झालेल्या17 व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्यसंमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते.

@यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक शरद गोरे,निमंत्रक डाॅ.बी.वाय.यादव,माजी आ.धनाजी साठे,,नगराध्यक्ष असिफ तांबोळी,पद्माकर कुलकर्णी,विलास जगदाळे,उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले,आयोजक फुलचंद नागटिळक,सोमेश्वर घानेगावकर,शोभाताई घुटे, महारुद्र जाधव आदी उपस्थित होते.

माने पुढे बोलताना म्हणाले की  अखंड हरिनाम सप्ताहात ग्रामीण साहित्य संमेलने करावीत हा बोधले महाराज यांनी दिलेला संदेश खरोखरच उत्तम आहे.साहित्य सेवेक-यांची भुमीका बजावत आहे.धडपड, संघर्ष व आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा बार्शीकरांचा गुणधर्म आहे.

उद्घाटक हभप.जयवंत बोधले महाराज बोलताना म्हणाले की ग्रामीण साहित्य संमेलन अखंड हरिनाम सप्ताहात भरवावे.सप्ताहात साहित्य संमेलन झाले तर जास्त लाभदायक होईल.

  प्रमुख पाहुणे शरद गोरे बोलताना म्हणाले की देशाचा इतिहास शेतक-यांनी घडवला आहे.देशात भाषा निर्माण करणारी शेतक-यांची मुले आहेत.मराठी अभिजात भाषा असुन पेशावर पर्यंत मराठ्यांचे राज्य होते.संस्कृतचा येथील भाषेशी दुराव्यान्वयेही संबंध नाही.बळीच्या राज्यात जात ही व्यवस्था नव्हती.भुगोल कच्चा असणारी माणसे कधीच इतिहास घडवु शकत नाहीत.सध्या देशात कृती शुन्यता वाढत असून कृतीशिलता वाढली पाहिजे.

प्रारंभी भगवंत मंदिरासमोरून ग्रंथ दिंडी काढण्यात आली.ग्रंथ दिंडीचे उद्घाटन अनंत बिडवे यांच्या हस्ते तर ग्रंथपुजन हभप विलास जगदाळे यांच्या हस्ते झाले.त्यानंतर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.राहुल जगदाळे निर्मित डाॅ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

माजी आ.धनाजी साठे,पद्माकर कुलकर्णी यांनीही विचार व्यक्त केले.सुत्रसंचालन धिरज शेळके यांनी केले.

चौकट; यांचा झाला सन्मान—
बालाजी जाधवर(अध्यात्म), साची वाडकर(वैमानिक),सदाशिव पडदुणे(उपजिल्हाधिकारी,लातुर),सुर्डी(कृषी पाणी दार गाव),प्रार्थना फाऊंडेशन, सोलापूर (सामाजिक),स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, पांगरी(ग्रंथालय) यांचा सन्मान झाला.

Leave a Reply