कव्हे येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू,बार्शी विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणाचा परिणाम
सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
कव्हे ता.बार्शी येथे विजेच्या धक्क्याने एका अल्पवयीन बालकाचे दुखःद निधन झाले. बार्शी शहरापासून अगदी दहा किलोमीटर असणाऱ्या गावांमध्ये मयत प्रणव लक्ष्मण सुरवसे हा आपल्या शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेला असता त्याठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी च्या तुटलेल्या तारे जवळ जात असताना त्यांच्या पायाचा स्पर्श तारेशी झाल्याने आणि ती विजेची तार हाय करंट ची असल्याने अगदी जोराचा विजेचा झटका त्या बालकास लागला. हा विजेचा झटका तीव्र असल्याने तो बालक अगदी जागेवरच मयत झाला अशी नोंद बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे नोंद झाली आहे. मयत झालेल्या बालकाचे नाव प्रणव लक्ष्मण सुरवसे असे असुन वय वर्ष 14 आहे. कभी या गावामध्ये विजेच्या धक्क्याने मयत होणारी ही दुसरी घटना असून याच वर्षांमध्ये अजून एक व्यक्ती गावातील डीपीच्या जवळ तुटलेल्या तारेला शॉक लागून मयत झाल्याचे समजले आहे. केवळ महा वितरण कंपनी च्या गलथान कारभारामुळे एकाच गावातील दोन जणांचे जीव गेले असून याबाबत मात्र कव्हे आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.