Advertisement
Categories: सामाजिक

मुलीच्या जन्माचे स्वागत बॅण्ड डिजे लावून

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
काटी येथे मुलीच्या जन्माचे बॅन्ड व डिजे लाऊन अनोख्या पद्धतीने  स्वागत करण्यात आले.अमित झोंबाडे व सौ.अक्षदा झोंबाडे असे आपल्या मुलीचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करणा-या त्या दाम्पत्याचे नाव असुन त्या दाम्पत्याला झालेली ही पहिलीच मुलगी आहे.

Advertisement


     मुलगी झाली प्रगती झाली असे म्हणत काटी येथील झोंबाडे- बोराडे परिवाराने मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत केले. बॅण्ड बाजा डिजे लावून तसेच फुलांच्या, रांगोळीच्या पायघड्या टाकत फुलांचा वर्षाव करीत, फटाक्यांचा आतषबाजीत मुलीचे स्वागत केले. या वेळी बाळाच्या आत्या अपूर्वा झोंबाडे म्हणाल्या, समाजातील मुलगा व मुलगी असा भेदभाव आपण नाहीसा केला पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे असा विचार न करता, दोन्ही घरात प्रकाश देणार्या मुलीच्या जन्माचे सर्वांनी आनंदाने स्वागत करावे. तसेच या वेळी घरात आल्यानंतर चिमुकल्या नाजुकीचे आणि तिच्या आईचे औक्षण बाळाची आज्जी सौ.सुनंदा बोराडे,
सौ.अरूणा झोंबाडे, शिल्पा बोराडे यांनी केले. पेढे वाटून आनंद साजरा केला, तसेच बाळाचे आजोबा सुनिल बोराडे, बाळासाहेब झोंबाडे तसेच मामा अभिषेक बोराडे, रोहित बोराडे, शुभम बोराडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Welcome to the birth of a girl with a band DJ

समाजात आजही अनेक ठिकाणी स्री भ्रुणहत्येच्या घटना घडत असून अनेक ठिकाणी मुलींचे जन्म झाल्यानंतर नवजात अर्भकसुद्धा अज्ञात ठिकाणी टाकुन देण्याचा घटना देखील घडतात आजच्या समाजाने मुलगा असो किंवा मुलगी असा कोणताच भेदभाव न करता दोन्हींच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात केले पाहिजे. आमच्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर आम्ही तिचे मनापासून स्वागत केले. तीला आम्ही आमच्या घरची लक्ष्मी मानतो. आम्ही खुप आनंदी झालो आहोत.
श्री. अमित झोंबाडे
सौ.अक्षदा झोंबाडे
(बाळाचे आईवडील)

admin

Recent Posts

पांगरीचा सुदर्शन गोडसे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात एकवीसवा

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज पांगरी ता.बार्शी येथील सुदर्शन दत्तात्रय गोडसे याने 2020 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा…

3 weeks ago

सुजित चौधरी युवा मंच आयोजित राष्ट्रवादी चषक क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज पिंपळवाडी ता.बार्शी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुजित चौधरी युवा…

3 weeks ago

बार्शीत महिलेचा ओढणीने गळा आवळून खुन,एकावर गुन्हा दाखल ,आरोपी फरार

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज कामावर जाण्याच्या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये झालेल्या भांडणातून सहकारी महिलेचा एकाने राहत्या…

3 weeks ago

बार्शीत शाहीर अमर शेख चौकात लेंडी नाल्यावरील स्लॅब दुरूस्तीकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज   बार्शी येथील शाहीर अमर शेख चौकात असलेल्या लेंडी नाल्यावरील नादुरुस्त…

2 months ago

बार्शीत खंडणीची मागणी,दोघांवर गुन्हा दाखल

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज सी.सी.टी.व्ही फुटेज चोरले म्हणून तक्रारी करतो कायर डॉ. संजय अंधारेला आमचेविरुध्द…

2 months ago

बार्शी तालुक्यातील शालेय पोषण आहारात उंदरांच्या लेण्ड्या,दोषींवर कारवाईची मागणी

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज https://youtu.be/KJgRcRsEzaM बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वितरित करण्यात आलेला…

2 months ago