June 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरीचा सुदर्शन गोडसे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात एकवीसवा

बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
पांगरी ता.बार्शी येथील सुदर्शन दत्तात्रय गोडसे याने 2020 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या इंजिनिअरिंग स्पर्धा परिक्षेत राज्यात 21 वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Advertisement

Pangri’s Sudarshan Godse is 21st in the state

  बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीनुसार सुदर्शन याने इयत्ता  चौथी स्कॉलरशिपमध्ये महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक मिळवला होता.त्याची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर साठी निवड निवड झाली होती.तसेच त्याने एनडीए परीक्षा उत्तीर्ण,शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (COEP) मधून सिव्हिल इंजिनिअर ची डिग्री प्राप्त 2020 मध्ये प्राप्त केली होती.
तसेच आर्मीमध्ये लेफ्टनंट पदाच्या इंटरव्यू साठीही निवड झाली होती.
कॉलेज कॅम्पस प्लेसमेंट्स मधून आकाश एज्युकेशन्स मध्ये फिजिक्स प्रोफेसर म्हणून निवड आठ लाखांचे पॅकेज नाकारले होते.
   एमपीएससीच्या अभ्यासासाठी आयआयटी मुंबई मधून एमटेक अर्ध्यातून सोडले होते.

यु पी एस सी आय इ एस पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण होत यश मिळवले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मध्ये सहाय्यक अभियंता पदी निवड झालेली असुन राज्यात सातवा क्रमांक मिळवला आहे.
   त्याला वडील दत्तात्रय गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले.यश मिळविल्याबद्दल गोडसे याचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply