बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी येथे गुणवंताचा गुणगौरव सोहळा
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
ढेंबरेवाडी ता.बार्शी येथे गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. प्रमिला नागटिळक हिने पिंपरी-चिंचवड येथे महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल व्याख्याते प्रा. विशाल गरड यांच्या हस्ते तिचा प्रत्यक्ष घरी जाऊन आई-वडीलांसह सन्मान करण्यात आला.
Merit Ceremony at Dhembarewadi in Barshi Taluka
यावेळी प्रा. विशाल गरड म्हणाले की, एका सामान्य कुटुंबातील मुलगी आज पोलिस होणं ही सध्याच्या स्पर्धेच्या युगात साधी गोष्ट नाही. अभ्यासात सातत्य ठेवल्याने आणि वेळोवेळी आईवडीलाचं तिला मिळालेलं सहकार्य हेच या यशामागील सर्वात मोठं कारण आहे. प्रमिलाने, आज हे यशसंपादन करून खेडे गावातील मुलींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा.
याप्रसंगी प्रा. विशाल गरड,सत्कारमूर्ती कु. प्रमिला नागटिळक,शुभम मिसाळ, सतीश नागटिळक, सरस्वती नागटिळक, कुशिंदर मुंढे,नामदेव काळेल,अनुसया घोळवे, विकास डोळे उपस्थित होते.