मुलीच्या जन्माचे स्वागत बॅण्ड डिजे लावून
बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
काटी येथे मुलीच्या जन्माचे बॅन्ड व डिजे लाऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.अमित झोंबाडे व सौ.अक्षदा झोंबाडे असे आपल्या मुलीचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करणा-या त्या दाम्पत्याचे नाव असुन त्या दाम्पत्याला झालेली ही पहिलीच मुलगी आहे.
मुलगी झाली प्रगती झाली असे म्हणत काटी येथील झोंबाडे- बोराडे परिवाराने मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत केले. बॅण्ड बाजा डिजे लावून तसेच फुलांच्या, रांगोळीच्या पायघड्या टाकत फुलांचा वर्षाव करीत, फटाक्यांचा आतषबाजीत मुलीचे स्वागत केले. या वेळी बाळाच्या आत्या अपूर्वा झोंबाडे म्हणाल्या, समाजातील मुलगा व मुलगी असा भेदभाव आपण नाहीसा केला पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे असा विचार न करता, दोन्ही घरात प्रकाश देणार्या मुलीच्या जन्माचे सर्वांनी आनंदाने स्वागत करावे. तसेच या वेळी घरात आल्यानंतर चिमुकल्या नाजुकीचे आणि तिच्या आईचे औक्षण बाळाची आज्जी सौ.सुनंदा बोराडे,
सौ.अरूणा झोंबाडे, शिल्पा बोराडे यांनी केले. पेढे वाटून आनंद साजरा केला, तसेच बाळाचे आजोबा सुनिल बोराडे, बाळासाहेब झोंबाडे तसेच मामा अभिषेक बोराडे, रोहित बोराडे, शुभम बोराडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
Welcome to the birth of a girl with a band DJ
समाजात आजही अनेक ठिकाणी स्री भ्रुणहत्येच्या घटना घडत असून अनेक ठिकाणी मुलींचे जन्म झाल्यानंतर नवजात अर्भकसुद्धा अज्ञात ठिकाणी टाकुन देण्याचा घटना देखील घडतात आजच्या समाजाने मुलगा असो किंवा मुलगी असा कोणताच भेदभाव न करता दोन्हींच्या जन्माचे स्वागत मोठ्या उत्साहात केले पाहिजे. आमच्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्यानंतर आम्ही तिचे मनापासून स्वागत केले. तीला आम्ही आमच्या घरची लक्ष्मी मानतो. आम्ही खुप आनंदी झालो आहोत.
श्री. अमित झोंबाडे
सौ.अक्षदा झोंबाडे
(बाळाचे आईवडील)