बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
तालुक्यातील विकास कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीच तडजोड चालणार नाही.निकृष्ठ कामे करणा-यांना नोटीसा काढुण त्यांच्याकडुण खुलासे घेऊन योग्य त्या कारवाया प्रस्तावित कराव्यात. अनुपस्थित अधिकाऱ्यांनाही नोटीस काढुण त्यांच्यावर कारवाई करावी असे प्रतिपादन आ.राजेंद्र राऊत यांनी केले.ते बार्शी पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती कामाकाजाबाबत आयोजित अधिकारी, पदाधिकारी आढावा बैठकीत बोलत होते.
The quality of development work will not be compromised; MLA Rajendra Raut, in the taluka review meeting, caught the officers on edge
यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी संताजी पाटील,माजी सभापती अनिल डिसले, प्रमोद वाघमोडे,माजी जि.प.सदस्य मदन दराडे,समाधान डोईफोडे,किरण मोरे,माजी सभापती अविनाश मांजरे,
इंद्रजित चिकणे,उमेश बारंगुळे, केशव घोगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार राजेंद्र राऊत यांनी बैठकीत कृषी विभाग, महिला बालविकास, आरोग्य, घरकुल,ग्रामपंचायत विभाग,पाणीपुरवठा, शिक्षण आदी विभागाची सखोल माहिती घेऊन अधिका-यांना सुचना करत अडचणी सांगा असे आवाहन केले.
बैठकीत गौडगाव येथील पाणी पुरवठा योजनेबाबत आलेल्या तक्रारीवर आ. राजेंद्र राऊत यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरत तालुक्यातील निकृष्ट पाणी पुरवठा योजनांची बिले मंजुर करू नयेत अशा सुचना केल्या.84 लाख रूपयांची योजना करूणही पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गावाला पाणी मिळत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त करत अधिका-यांना चांगलेच खडसावत 90 % बिल दिलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला.गत दहा वर्षातील तालुक्यातील पाणी पुरवठा योजना व त्यांची सद्यस्थिती याचीही माहिती मला तात्काळ द्यावी अशा सुचना आ.राऊत यांनी पाणी पुरवठा विभागास दिल्या.
शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील मोठ्या जि.प.शाळांसाठी क्रीडांगण, शाळा दुरूस्तीचे प्रस्ताव तयार करून पाठवावेत असे सांगितले.
तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागाचाही आढावा घेऊन अडचणी सोडवण्यास आपण प्रयत्नशील आहे असे सांगितले.कासारवाडीचे सरपंच नितीन मंडलिक यांनी बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाबाबत तक्रार उपस्थित केल्यावर आ.राऊत यांनी संबंधित अधिका-यांना सुचना देऊन कामाबाबत तक्रार येणार नाही याची काळजी घ्या असे सांगीतले.अलिपुर, कासारवाडी येथे लसीकरण करण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दलही आ.राऊत यांनी अधिका-यांना चांगलेच झाले.
तालुक्यातील रिक्त शिक्षकाची माहिती घेऊन ति भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून गती द्यावी असे सांगून शिक्षण विभागानेही यासाठी पाठपुरावा करावा असे सांगितले.
यावेळी जि.प.शाळेत वाटप करण्यात आलेल्या निकृष्ट शालेय पोषण आहाराबाबत आलेल्या तक्रारीवर शिक्षण विभागाच्या अधिका-यांना आ.राऊत यांनी चांगलेच झापुन दोषींवर गुन्हे दाखल करावेत असे सांगितले.
बैठकीला उपस्थित अभियंता डी.पी.गौंडरे, शाखा अभियंता आयुब शेख,कृषीचे किशोर अंधारे,महिला बालविकासचे शैलेश सदाफुले,पाणी पुरवठा उप अभियंता एस.एम.मंडलिक, पशुधन अधिकारी एम ए.कोळेकर,ल.पा.चे ए.ए.तांबोळी,एन.पी.खळदकर आदी उपस्थित होते.
#चौकट; आढावा बैठकीला महिला बालविकास प्रकल्प अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी व ईतर अनुपस्थित अधिका-यांना नोटीस काढुण खुलासे घ्या असे अधिका-यांना ठणकावले.
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज https://youtu.be/KJgRcRsEzaM बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वितरित करण्यात आलेला…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज गावातील सुंदर रस्ते हे गावाचे वैभव असते.त्यामुळेच गावच्या सौंदर्यात भर पडते…
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज पिंपळगाव (पान) ता.बार्शी येथील जि.प.प्राथमिक शाळेची तिसरीची विद्यार्थीनी कु.सान्वी दत्ताञय गोरे हिने…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युजझोक्याची साडी फाडल्याचा आरोप करत चौघांनी मिळुन दोघाना शिविगाळ करुन काठीने मारहाण…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज ढेंबरेवाडी ता.बार्शी येथे गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. प्रमिला नागटिळक हिने पिंपरी-चिंचवड…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे *विद्वान* होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण संपादन…