April 20, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

विकास कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड चालणार नाही; आ.राजेंद्र राऊत ,तालुका आढावा बैठकीत अधिका-यांना धरले धारेवर

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
तालुक्यातील विकास कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीच तडजोड चालणार नाही.निकृष्ठ कामे करणा-यांना नोटीसा काढुण त्यांच्याकडुण खुलासे घेऊन योग्य त्या कारवाया प्रस्तावित कराव्यात. अनुपस्थित अधिकाऱ्यांनाही नोटीस काढुण त्यांच्यावर कारवाई करावी असे प्रतिपादन आ.राजेंद्र राऊत यांनी केले.ते बार्शी पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती कामाकाजाबाबत आयोजित अधिकारी, पदाधिकारी  आढावा बैठकीत बोलत होते.

Advertisement

The quality of development work will not be compromised; MLA Rajendra Raut, in the taluka review meeting, caught the officers on edge
यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी संताजी पाटील,माजी सभापती अनिल डिसले, प्रमोद वाघमोडे,माजी जि.प.सदस्य मदन दराडे,समाधान डोईफोडे,किरण मोरे,माजी सभापती अविनाश मांजरे,
इंद्रजित चिकणे,उमेश बारंगुळे, केशव घोगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
  आमदार राजेंद्र राऊत यांनी बैठकीत कृषी विभाग, महिला बालविकास, आरोग्य, घरकुल,ग्रामपंचायत विभाग,पाणीपुरवठा, शिक्षण आदी विभागाची सखोल माहिती घेऊन अधिका-यांना सुचना करत अडचणी सांगा असे आवाहन केले.
बैठकीत गौडगाव येथील पाणी पुरवठा योजनेबाबत आलेल्या तक्रारीवर आ. राजेंद्र राऊत यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरत तालुक्यातील निकृष्ट पाणी पुरवठा योजनांची बिले मंजुर करू नयेत अशा सुचना केल्या.84 लाख रूपयांची योजना करूणही पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गावाला पाणी मिळत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त करत अधिका-यांना चांगलेच खडसावत 90 % बिल दिलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला.गत दहा वर्षातील तालुक्यातील पाणी पुरवठा योजना व त्यांची सद्यस्थिती याचीही माहिती मला तात्काळ द्यावी अशा सुचना आ.राऊत यांनी पाणी पुरवठा विभागास दिल्या.
शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील मोठ्या जि.प.शाळांसाठी क्रीडांगण, शाळा दुरूस्तीचे प्रस्ताव तयार करून पाठवावेत असे सांगितले.
तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागाचाही आढावा घेऊन अडचणी सोडवण्यास आपण प्रयत्नशील आहे असे सांगितले.कासारवाडीचे सरपंच नितीन मंडलिक यांनी बैठकीत पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाबाबत तक्रार उपस्थित केल्यावर आ.राऊत यांनी संबंधित अधिका-यांना सुचना देऊन कामाबाबत तक्रार येणार नाही याची काळजी घ्या असे सांगीतले.अलिपुर, कासारवाडी येथे लसीकरण करण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दलही आ.राऊत यांनी अधिका-यांना चांगलेच झाले.
तालुक्यातील रिक्त शिक्षकाची माहिती घेऊन ति भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून गती द्यावी असे सांगून शिक्षण विभागानेही यासाठी पाठपुरावा करावा असे सांगितले.
यावेळी जि.प.शाळेत वाटप करण्यात आलेल्या निकृष्ट शालेय पोषण आहाराबाबत आलेल्या तक्रारीवर शिक्षण विभागाच्या अधिका-यांना आ.राऊत यांनी चांगलेच  झापुन दोषींवर गुन्हे दाखल करावेत असे  सांगितले.

बैठकीला उपस्थित अभियंता डी.पी.गौंडरे, शाखा अभियंता आयुब शेख,कृषीचे किशोर अंधारे,महिला बालविकासचे शैलेश सदाफुले,पाणी पुरवठा उप अभियंता एस.एम.मंडलिक, पशुधन अधिकारी एम ए.कोळेकर,ल.पा.चे  ए.ए.तांबोळी,एन.पी.खळदकर आदी उपस्थित होते.

#चौकट; आढावा बैठकीला महिला बालविकास प्रकल्प अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी व ईतर अनुपस्थित अधिका-यांना नोटीस काढुण खुलासे घ्या असे अधिका-यांना ठणकावले.

Leave a Reply

disawar satta king