सान्वी गोरेचे उल्लेखनीय यश
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
Advertisement
पिंपळगाव (पान) ता.बार्शी येथील जि.प.प्राथमिक शाळेची तिसरीची विद्यार्थीनी कु.सान्वी दत्ताञय गोरे हिने महाराष्ट्र चेस असोसिएशन आयोजित दहा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत 7 पैकी 5 सामन्यात सहज विजय मिळवत मुलींमध्ये राज्यात सातवा क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील 28 आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंसह एकुण 161 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.तिला सुमुख गायकवाड (सोलापुर),युवराज पोगुल(सोलापुर),नितीन अग्रवाल(बार्शी) यांचे मार्गदर्शन लाभले.
सान्वीच्या यशाबद्दल गटशिक्षण अधिकारी लक्ष्मीकांत जाधव,केंद्र प्रमुख विलास शिराळ,पिंपळगावच्या सरपंच सौ.बालिका बोधले आदींसह पिंपळगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Sanvi Gore’s remarkable achievement