June 10, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

खांडवीच्या त्या सचिवास कार्यमुक्त करण्यासाठी झालेले धरणे आंदोलन आश्वासनानंतर मागे

व्हिडिओ 👆

बार्शी ;

खांडवी वि.का.सेवा सह.सोसायटीचे सचिव रमेश  खडुळ यांना कार्यमुक्त करावे यासाठी आकाश दळवी यांनी आज खांडवी सोसायटी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.45 दिवसात चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर  धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

Advertisement

The dam agitation to dismiss that secretary of Khandvi backfires after assurances

# आकाश दळवी यांनी  याबाबत लेखी निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्याचा ईषारा देण्यात आला होता.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
खांडवी वि.का.सेवा सह.सोसायटीत अफरातफर झाल्याचे दिसून येत आहे. संस्थेचे सचिव रमेश खडूळ यांनी सोसायटीला शिपाई पगार नावे टाकला आहे .सोसायटीला अधिकृत शिपाई नेमणूक नसताना. अधिकारी वर्गातील यांना नोकरीवर तीन वर्षे पेक्षा एकाच ठिकाणी नोकरी करता येत नाही. ऑफिस भाडे नावे टाकले आहे पण प्रत्यक्षात ऑफिस भाडे अदा केले नाही करत नाहीत वार्षिक सर्वसाधारण सभा झालीच नाही तरी वार्षिक सर्वसाधारण सभेचा खर्च नावे टाकला आहे, जेकी फक्त कागदोपत्री घेतल्या जातात. व्याज आकारणी जास्त केलेली आहे. सदर सचिवाच्या काळात आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. 

तसेच संस्थेचे ऑडिट वेळेत पूर्ण झाले नाहीत का झाले नाहीत याचे स्पष्टीकरण नाही. (सण २०१८-१९) १ नमुन्यातील सभासद रजिस्टर व जे नमुन्यातील यादी नाही. दोष दुरुस्ती अहवाल पाठवला नाही. कॅशबुक अपूर्ण आहे. बँक खाती जुळत नाहीत. कर्ज व्यवहार एनपीए तरतूद पान नंबर १८ (सन २०१९-२०) ऑडिट रिपोर्ट थकबाकीची टक्केवारी ६४.१६%, NPA ५.१७% (पान.नं.२०).

तसेच मागील चार वर्षाचे लेखापरीक्षण आर.बी.तुपे या एकाच लेखापरीक्षकांनी केलेले आहे. सन-२०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० हे नियमाविरुद्ध आहे. संस्थेचे ऑडिट नियमानुसार झाले नसून सदर संस्थेचे ऑडिट शासकीय ऑडिटर कडून करण्यात यावे. सदर सचिवावरती उचित कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 

झालेल्या अपहार,अफरातफर भ्रष्टाचाराबाबत संबंधित संचालक मंडळ सचिव व संबंधित अधिकारी,कर्मचारी यांच्या विरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले.

Leave a Reply