June 10, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

लहान मुलांना रेमडेसीवीर देण्यास आरोग्य मंत्रालयाकडून नकार,गाईडलाईन्स जाहीर..

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उपचारासाठी मार्गदर्शक तत्वही प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून सविस्तरपणे देण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये  लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारसच करण्यात आलेली नाही. तसेच रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांसाठीच औषधांचा वापर केला जावा असंही स्पष्ट करण्यात आलेल आहे.

Advertisement

Ministry of Health refuses to give Remedesivir to children, guidelines issued ..

“लहान मुलांसाठी रेमडेसिविरची शिफारस करण्यात आलेली नाही. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये रेमडेसिविरच्या संदर्भात पुरेसी सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या डेटाचा अभाव आहे,” असं सांगण्यात आलेल आहे.

दरम्यान यावेळी १२ वर्षांच्या पुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी सहा मिनिटं वॉकची शिफारस करण्यात आलेली आहे. अनियंत्रित अस्थमा असणाऱ्यांसाठी या टेस्टची शिफारस करण्यता आलेली नाही.
करोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू केली जाणं गरजेच आहे, द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखले जाणं आवश्यक आहे आणि कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी, असंही सांगण्यात आलं आहे.

लक्षणं नसणाऱ्या अथवा सौम्य कोरोना केसेसमध्ये उत्तेजक (स्टिरॉईड) धोकादायक ठरु शकतात यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभीर आजारी असणाऱ्या कोरोना रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली देण्यात यावं असेही स्पष्ट करण्यात आलेल आहे. “स्टिरॉईड योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावीत,” असेही मार्गदर्शक तत्वामध्ये सांगण्यात आलेल आहे.

तज्ञांच्या मते स्टिरॉईडसर्रासपणे होणारा वापर देशात काळ्या बुरशीचा संसर्ग निर्माण होण्याचं महत्त्वाच कारण आहे. तसंच पाच वर्षांखालील मुलांना मास्क लावू नका आणि सहा ते ११ वर्षांमधील मुलांना आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखालीच मास्क घालावेत असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान यावेळी डॉक्टरांना अत्यंत गरज असेल तरच करोना पॉझिटिव्ह लहान मुलांना सीटी स्कॅनसाठी सांगण्यात यावं असेही स्पष्ट सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply