June 9, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी शहर व तालुक्यात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

बार्शी ;

बार्शी शहर व तालुक्यात ठिक ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.Shivrajyabhishek Day celebrated in Barshi city and taluka

Advertisement

@जय शिवराय प्रतिष्ठान, बार्शी;-
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४७ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जय शिवराय प्रतिष्ठान कडून अठरा पगड जाती व  बारा बलुतेदार मावळ्यांकडून
पवित्र नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करत  कार्यक्रम मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत करण्यात आला.१०२१ लाडूंचे वाटप करण्यात आले.
  यावेळी आ. राजेंद्र राऊत,नगराध्यक्ष आसिफ तांबोळी पं.स. सभापती अनिल डिसले, अविनाश मांजरे, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील ,आरोग्य सभापती संदेश काकडे, संतोष बारंगूळे,  मदन गव्हाणे , रोहित लाकाळ , महेश जगताप ,ऋषीकांत पाटील आदी उपस्थितीत होते.

@पांगरी ग्रामपंचायत;-
पांगरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.पांगरीच्या सरपंच सौ. सुरेखा लाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपसरपंच धनंजय खवले,तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख, डॉ.विलास लाडे,तात्या बोधे,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ नारायनकर,गणेश गोडसे आदी  उपस्थित होते.

#कुसळंब ग्रामपंचायत;- येथील ग्रामपंचायतीच्या वतीनेही शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गावात ठिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी सरपंच शिवाजी खोडवे,विजय उकिरडे,वैभव पोटरे,गणेश काळे,रोहित शिंदे,केशव काशिद, नाना काशिद, नारायण शिंदे,गाव कामगार तलाठी राठोड ,अजय ननवरे,  नाना गादेकर , गणेश चौधरी ,भाऊराव काशिद, संजय बोकेफोडे आदी उपस्थित होते.
@कासारवाडी ग्रामपंचायत;-
    ग्रामपंचायत कासारवाडीच्या वतीने शिवस्वराज्य दिन  साजरा करण्यात आला.यावेळी शिवशक राजदंडाचे पूजन सरपंच सौ.अश्विनी मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. तर शिवप्रतिमेचे पूजन उपसरपंच जितेंद्र गायकवाड  व ग्रामपंचायत सदस्या अंजना पंडित यमगर यांच्या हस्ते करण्यात आले.
मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या सौ.रतन कदम , सौ.वैशाली मस्के, सौ.अंबिका काळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामसेवक राहुल गरड,ग्रामपंचायत सदस्य विनोद थोरात, सुधीर शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते .

#नागोबाचीवाडी ग्रामपंचायत;-
नागोबाचीवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय व जि.प.प्रा शाळा नागोबाचीवाडी येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी युवा नेते अजित बारंगुळे,
सरपंच सौ.रागिणी  बारंगुळे,ग्रामसेविका,मुख्याध्यापक विवेकानंद जगदाळे,शिक्षक,अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर आदी उपस्थित होते.

Leave a Reply