पिक कर्जाचे त्वरीत वाटप करण्याची बार्शी विधानसभा राष्ट्रवादी युवक क्राॅग्रेसची मागणी
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप लवकरात लवकर करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक क्राॅग्रेसचे बार्शी विधानसभा अध्यक्ष नवाज मुलाणी यांनी बार्शी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे व सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. दीड वर्षे होत आलेला आहे.
Barshi Assembly Nationalist Youth Congress demands speedy disbursement of crop loans
कोरोनाच्याकाळात शेतीमालाला म्हणावा तसा भाव न मिळाल्यामुळे येणाऱ्या खरीप
हंगामात बियाणांची व खताची जुळवाजुळव करण्यासाठी सावकाराशिवाय
शेतकऱ्यांसमोर पर्याय उरणार नाही. कर्ज वाटप सुरु केल्यास शेतकऱ्यांच्या
समोरचे आर्थिक संकट दूर होण्यास मदत हाईल, सध्या लॉकडाऊन असल्यामुळे
व गर्दी होऊ नये म्हणून बँकांनी आपली वेळ बदलली असल्यामुळे व बँकामध्ये
कर्मचारी कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्याने जायचे कोणाकडे हा प्रश्न
भेडसावत आहे. तरी शेतकरी वर्गाला कोणतीही अडवणुक न करता राष्ट्रीयकृत
व जिल्हा बँकेने खरीप पीक कर्ज वाटप करावे असे निवेदनात नमूद केले आहे.