December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गळा आवळून खून प्रकरण,आरोपीचा जामीण फेटाळला

बार्शी:महाराष्ट्र स्पीड न्युज
साडीने गळा आवळून खुन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकराचा जामीन बार्शी न्यायालयाचे  न्यायाधीश चव्हाण यांनी नाकारला आहे.
@रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी वय-२५ वर्षे रा.सांगोला असे जामीन नाकारण्यात आलेल्याचे नाव आहे.
     प्रेमसंबंधातून दुसरे लग्न केलेल्या विवाहित तरुणीचा प्रियकरानेच संशय आणि जेवनाच्या कारणावरून झालेल्या वादातून गळा आवळून खून केला होता प्रकार बार्शीतील शंभर फुटी रोड भागात   ९ एप्रिल २०२१ रोजी उघडकीस आला होता.

Advertisement

The accused’s bail was rejected in the murder case

#रूकसार अलीम मुलाणी वय-२८ वर्षे रा.उपळाई रोड, बार्शी असे खुन झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

  #रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी वय-२५ वर्षे रा.सांगोला याच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

# जुबेदा म. हुसेन खान वय-६० वर्षे रा.बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. रूकसार मुलाणी हिचे लग्न गत दहा वर्षापुर्वी बारंगुळे प्लॉट येथील अलीम नजीर मुलाणी याच्यासोबत  झाले होते.त्यापासून रुकसारला अब्बास मुलाणी वय-१० वर्षे,उमेरा मुलाणी वय-८ वर्षे दोन मूली अशी अपत्ये होती.
    अलीम मुलाणी हा कामधंदा न करता दारुचे व्यसन करीत होता व बायकोवर संशय घेत होता त्यामुळे ती माहेरी रहायला आली होती.त्यानंतर तीन महिन्यापूर्वी सांगोला येथे हॉटेलमध्ये धूणे-भांड्याचे काम करण्यासाठी गेली होती.त्यावेळी तिचे रिहानशी प्रेमसंबंध जुळले.रिहानने ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगून दोन्ही मुलांना संभाळायला तयार असल्याचे सांगितले.त्यानंतर ते दोघेही लग्न करून बार्शीतील शंभर फूटी रोड उपळाई रोड येथे राहण्यासाठी आले.त्यानंतर दोन्ही मुलांना महाबळेश्वर येथील मदरशामध्ये टाकण्यात आले होते.दि.८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जेवणाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.त्यावेळी रुकसारने आईला रिहान हा फोन वापरु देत नाही व संशय घेत असल्याचे सांगितले होते.त्यानंतर आईने वाद मिटवून त्यांच्या गाडेगाव रोड येथील घरी गेल्या होत्या.त्यानंतर त्या दि.९ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजता मुलगी रूकसारकडे गेल्या त्यावेळी बाहेरून दाराला कडी लावल्याचे दिसले.कडी उघडून त्या घरात गेल्यानंतर किचनमध्ये त्यांची मुलगी पडलेली दिसली.तिच्या नाका तोंडातून रक्त येत होते.शरीराची काहीच हालचाल होत नव्हती.त्यामुळे नातेवाईकांना बोलवून घेऊन सरकारी दवाखान्यात घेऊन गेले असता त्यावेळी रूकसार ही मयत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
त्यानंतर फिर्यादीने रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी याच्या विरुद्ध नाक तोंड व गळा दाबून जीवे ठार मारल्याची तक्रार दिली होती.संशयीतास तपास अधिकारी सपोनी  ज्ञानेश्वर उदार यांनी शोध घेऊन अटक केली होती.आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र न्यायमूर्ती चव्हाण यांनी जामीन नाकारला.फिर्यादीच्या वतीने अॅड रियाज शेख यांनी काम पाहिले.

Leave a Reply