June 5, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी आगारातून सोलापूर व पुणे येथे जाण्यासाठी प्रवासी सेवा सुरु

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बार्शी आगारातून सोलापूर व पुणे येथे जाण्यासाठी एसटीने प्रवाशी वाहतुक सेवा सुरू केली आहे.

Advertisement

Passenger service from Barshi depot to Solapur and Pune started
एक जुन एसटीच्या वर्धापन दिनी बार्शी आगारात बार्शीचे आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांच्या हस्ते नारळ वाढवून याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानक प्रमुख स्मिता मिसाळ, वाहतूक निरीक्षक संजय वायदंडे आगार लेखाकार विजय बुटे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रामचंद्र गवळी,वाहतुक निरीक्षक जयसिंग परदेशी, पंकज सावंत,महेंद्र क्षिरसागर, पवन वाघुलकर आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यापासून कोरोना या महाभयंकर विषाणू आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन असताना शासनाने एसटी ची प्रवाशी वाहतूक सेवा बंद ठेवली होती परंतू आता रुग्ण संख्या कमी झाल्याने शासनाने प्रवासी वाहतूकीला परवानगी दिली आहे यातच एसटी महामंडळाचा दिनांक 1 जून हा वर्धापन दिनी असल्याने बार्शी आगारातून सोलापूर व स्वारगेट ( पुणे ) याठिकाणी प्रवाशी वाहतुकीसाठी सकाळी आठ ,सकाळी नऊ सकाळी दहा या वेळेत एसटी बसची वाहतूक सुरू केली आहे तसेच ज्या प्रवाशांना महाराष्ट्रातील इतर शहरात प्रवास करायचा असेल अशा प्रवाशांसाठी एसटी ने ज्यादा वाहतुकीची सोय केली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक मोहन वाकळे यांनी दिली. परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस मध्ये प्रवास करताना प्रवाशांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल यामध्ये प्रवाशांनी सोशल डिस्टेंट, मास्क व सेेनिटायजर आदींचा वापर करणे आवश्यक असल्याचे एसटी प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave a Reply