June 5, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पीक कर्ज वाटप सुरू करा:-अशोक माळी

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व सततच्या लॉकडाऊन मुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे,दीड वर्ष होत आले कोरोनाच्या काळात शेतकऱ्याच्या शेतमालाला म्हणावा तसा भाव न मिळाल्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात बियाणांची व खताची जुळवाजुळव करण्यासाठी सावकारा शिवाय शेतकऱ्यां समोर पर्याय उरला नाही,शेतकरी वर्गाला कोणतीही अडवणूक न करता राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप लवकरात लवकर करावे अशी मागणी बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी यांनी सहाय्यक निबंधक सोलापूर यांच्याकडे केली आहे.
  मागणी केल्यावर निबंधक कार्यालयाकडुण संबंधित बँकेला याबाबत उचीत कार्यवाही करा असे पत्र देऊन तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी उलटुन जाऊनही अद्याप प्रगती दिसुन येत नाही.

कर्ज वाटप सुरू केल्यास शेतकऱ्यां समोरचे आर्थिक संकट दूर होण्यास मदत होईल,सध्या लॉकडाऊन असल्यामुळे व गर्दी होऊ नये म्हणून बँकांनी आपली वेळ बदलली असल्यामुळे व बँका मध्ये कर्मचारी कमी प्रमाणात असल्यामुळे,शेतकऱ्याने जायचे कुणाकडे हा प्रश्न भेडसावत आहे,सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाने ऑनलाइन कर्ज फॉर्म भरण्यासाठी सांगितले आहे, परंतु अर्ज भरून देखील बँकेचा मेसेज येत नाही, तर या ऑनलाइन अर्जाचा फॉर्म शेतकऱ्यांनी भरून काय उपयोग होणार आहे, येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये जर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही, तर शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती  माळी यांनी केली आहे.

Allocation of crop loan should be started: -Ashok Mali

Leave a Reply