June 4, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील पुरी येथे खत दुकान फोडुण एक लाख सत्तर हजाराची चोरी

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
चोरट्यांनी पुणे-लातुर राज्य मार्गावर असलेले पुरी ता.बार्शी येथील खत,बि,बियाने विक्रीचे दुकान फोडुण रोख रक्कम सोयाबीनचे विविध कंपन्यांचे 52 कट्टे,ग्रॅन्डर व ड्रिल मशीन असा एक लाख सत्तर हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार आज दि.3 गुरूवारी सकाळी उघडकीस आला.

Advertisement

One lakh seventy thousand was stolen from a fertilizer shop at Puri in Barshi taluka

#अमर  झालटे वय-29 वर्षे,रा-पूरी, ता- बार्शी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पूरी येथे बार्शी ते पांगरी
जाण्या-या रस्त्यावर त्यांचे सत्यशिव ऍग्रो एजन्सी नावाचे दुकान आहे.  सध्या लॅकडाउन
असल्याने दुकान सकाळी 07/00 वा. उघडुन दुपारी 02/00 वा. बंद करत असतात.
काल दि. 02/06/2021 रोजी नेहमी प्रमाणे  दुकान सकाळी 07/00 वा. उघडुन दुपारी 02/00 वा. बंद करून दुकानाला व्यवस्थीत
कुलूप लावुन घरी गेले होते.त्यानंतर आज दिनांक 03/06/2021 रोजी सकाळी 07/00 वा. सुमारास ते नेहमी प्रमाणे दुकान उघडण्या
करता आले असता  दुकानाचे एकुन तीन शटर पैकी मध्यभागी असलेले शटर आर्धवट उघडे दिसले.त्यांनी जवळ जावुन पाहिले
असता शटरचे सेंटर लॅक तोडलेले व शटर उचकटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी हा प्रकार नातेवाईकांना
सांगितल्या नंतर सर्वजन  दुकाना जवळ आले व त्यानी सदरचा प्रकार पाहिल्या नंतर  बाजुचे शटर उघडुन आत दुकांना मध्ये जावुन पाहणी केली असता दुकानामध्ये पाठीमागील बाजुस ठेवलेले सोयाबीन बीयानाने भरलेले वेगवेगळ्या कंपनीच्या गोन्या
नसल्याचे दिसुन आले. तसेच दुकानाचे काऊंटर जवळ उचकाउचकी केलेली दिसली. काऊंटर देखील उचकल्याचे दिसुन आले त्यांनतर दुकानात चोरी झाल्याची  खात्री झाली.
याबाबत पांगरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण सिरसाट हे करत आहेत.

Leave a Reply