June 3, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीचे सुपुत्र रणजित सिंह डिसले यांची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागार समितीवर निवड

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शीचे सुपुत्र तथा भारत देशातील पहिले ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त युवा शिक्षक रणजितसिंह डिसले (गुरुजी)  यांची  जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागार समितीवर निवड करण्यात आली आहे.त्यांची ही निवड जून 2021 ते जून 2024 या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. रणजित सिंह यांची निवड भारतातील शैक्षणिक वृद्धीत वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरेल असे दिसत आहे.

Advertisement

Barshi’s son Ranjit Singh Disley elected to World Bank Education Advisory Committee

   जागतिक बँकेकडून संपुर्ण जगामधील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणे,त्यात सुधारना करणे याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.

यासाठी ग्लोबल कोच या  नावाने एक विशेष उपक्रम हाती घेन्यात आलेला आहे.

या विशेष उपक्रमा अंतर्गत जगा मधील मुलांच्या शैक्षणिक पातळीत  वाढ करने हा हेतू ठेवण्यात आलेला आहे.

  बार्शीचे सुपुत्र तथा भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या व भारता च्याही शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

   शैक्षणिक पातळी वाढविण्यासाठी अनेक प्रकारची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संपूर्ण जगातून 12 व्यक्तींची सल्लागार पदावर  नियुक्ती करण्यात आली आहे.ही समिती व त्यामधील सर्व सदशय तंत्रज्ञानावर आधारित असलेले वेववेगळे प्रशिक्षण कार्यक्रम,उपक्रम तयार करून  21व्या शतकामधील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे रणजित सिंह डिसले (गुरुजी) यांनी सांगितले.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशच्या मार्फत देण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल टीचर प्राईज’ साठी बार्शीचे सुपुत्र तथा सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झालेला होता.तब्बल 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह डिसले गुरुजी हे प्रथम भारतीय शिक्षक ठरले होते. दरम्यान, रणजितसिंह डिसलेयांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाणार आहे.
  कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप, असे त्या शिष्यवृत्तीला  नाव देण्यात आलेले आहे.तब्बल 400 युरोंची सदरची शिष्यवृत्ती सॅमनिटे राज्या मधील 10 विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार आहे

Leave a Reply