June 4, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जाचहाट प्रकरणी टेंभुर्णीतील चौघांवर बार्शीत गुन्हा दाखल

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
माहेरहून पैसे घेऊन येण्याच्या व चरित्राचा संशय घेऊन घेऊन विवाहितेसह तिच्या आई वडीलांनाही शिवागाळ करूण मारहाण करत घरातुन हाकलून दिल्याचा प्रकार माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील कदम वस्तीवर घडला.

Advertisement

#समाधान नारायण कोल्हे, नारायण लक्ष्मण कोल्हे, छाया नारायण कोल्हे, व उमेश नारायण कोल्हे, सर्व रा. कन्हेरगाव रोड एम.आय.डी.सी. जवळ कदम वस्ती टेभुर्णी ता. माढा अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

Four persons from Tembhurni have been booked by the Barshi police in connection with the assault case

#शिवानी समाधान कोल्हे वय 25 वर्षे, रा. कुर्डुवाडी रोड, मुल्ला प्लॉट बार्शी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा विवाह समाधान  कोल्हे रा. कदम वस्ती टेभुर्णी, यांचेशी 2014 मध्ये  झालेले आहे. पती ड्रायव्हर म्हणुन काम करतात.लग्न झाल्यापासुन सासरी नांदणेस असताना मला सासु छाया कोल्हे, सासरे नारायण कोल्हे, व दिर उमेश कोल्हे, यांनी लग्नानंतर सहा महीण्यापासुन किरकोळ कारणावरून  घालुन पाडुन टोमणे मारून माझेशी भांडण करण्यास सुरवात केली. तसेच  पती समाधान हे मला टिप्पर ट्रक घ्यावयाची आहे तु माहेरून 2,00000/- रू घेवुन ये असे म्हणुन तिच्याशी भांडण करून मला माहेरी हाकलुन देत होते.माहेरून पैसे देणे जमत नाही असे सांगताच ते मी परत सासरी नांदायला गेल्यावर शारिरीक व मानसिक छळ करून माहेरून पैसे घेवुन ये नाहीतर तुला व तुझ्या माहेरच्या लोकांना जीवे ठार मारीन अशी धमकी देत होते.
   माझे माहेरीकडील लोकांनी पती समाधान यांना टिप्पर घेण्यासाठी पैसे देवुन मला नांदण्यास पाठविले. त्यानंतर थोडे दिवस नीट नांदवले. व परत पुन्हा पैसे आन म्हणुन त्रासाला सुरूवात केली. तसेच मी पैसे आणत नाही हे पाहुन त्यांनी मला नांदवायचे नाही या उद्देशाने माझ्या सासरकडील लोकांनी माझे चारीत्र्यावर संशय घेवुन माझ्याशी वाद घालुन मला मारहाण करत होते.       
दि.26/05/2021 रोजी पासुन सासरचे लोक माझ्याशी भांडत होते. यामुळे मी माझे आई वडीलांना सासरी बोलावुन घेतले होते. यामुळे दि.28/05/2021 दुपारी 02/00वा. चे. सुमारास माझे आई वडील मला भेटण्यासाठी माझे सासरी आले होते. त्यावेळी माझे आई वडील हे पती समाधान व सासरकडील लोकांना समजुन सांगत असताना चिडुन जावुन आम्हाला तुमची मुलगी नांदवायची नाही ती चारीत्रहीन आहे असे म्हणुन  पती समाधान यांनी माझ्या आई वडीलांना शिवीगाळी व मारहाण करण्यास सुरूवात केली त्यावेळी माझे सासु छाया, सासरे नारायण, व दिर उमेश, असे सर्वजन तेथेच होते. त्यांनी सर्वानी मिळुन मला व माझे आई वडीलांना मारहाण करून शिवागीळ करून घरातुन हकलुन लावले.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात जाचहाट,मारहाण करूण जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply