June 3, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अत्याचार करून खून केल्या प्रकरणी अटक असलेल्या करमाळा तालुक्यातील आरोपीची जामिनावर मुक्तता

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
विवाहितेवर अत्याचार करून खून केल्या प्रकरणी अटक असलेल्या करमाळा तालुक्यातील आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
धनाजी प्रभाकर गाडे वय 28 वर्षे रा. वीट ता. करमाळा असे बार्शी येथिल सत्र न्यायाधीश आर.एस.पाटील यांनी जामिनावर मुक्तता केलेल्याचे नाव आहे.

Accused of murder in Karmala taluka released on bail

यात हकीकत अशी की,दि.16/02/2021 रोजी फिर्यादी मार्केट
यार्ड सोलापूर येथे मालवाहतूक ट्रक घेऊन गेलेला
होता.त्यानंतर परत माघारी येताना फिर्यादीचे त्याची
पत्नीशी (पीडिता) दि. 17.2.2021 रोजी सकाळी 9 वा. फोनवर
बोलणे झाले होते.
त्यानंतर फिर्यादी दुपारी घरी आल्यानंतर घरी पत्नी दिसून
न आल्याने पत्नीचा शोध घेतला असता शेतामध्ये कॅनॉल
च्या बाजूला फुटलेल्या बांगड्या आणि जमिनीवर निशाण
दिसून आले आणि त्या निशानाच्या दिशेने झाडाखाली त्याची
पत्नी अर्धनग्न अवस्थेत मृत स्थितीत दिसून आली.
त्यानंतर फिर्यादीने सदर घटनेबाबत करमाळा पोलीस
ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली.
पोलीस तपासात वरील आरोपीने सदर विवाहितेचा बलात्कार
करून खून केलेचे दिसून आले. वरील आरोपीला अटक करण्यात आली.
त्यानंतर आरोपीने जामीन मिळणेकामी ऍड प्रशांत देशमुख
यांचेमार्फत जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. सदर
अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश
आर.एस.पाटील यांच्यासमोर झाली. सदरकामी ऍड प्रशांत
देशमुख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून वरील आरोपीचा
जामीन मंजूर करण्यात आला.
सदरकामी सरकारतर्फे ऍड. डी.डी. देशमुख तर आरोपितर्फे ऍड
प्रशांत देशमुख, ऍड बापू गलांडे ,
ऍड विवेक पकाले, यांनी काम
पाहिले.

Leave a Reply