Korona Virus;आपत्ती निवारणासारखेच होणार लस वाटपाचे काम,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश
नवी दिल्ली :
देशातील कोरोनाची स्थिती, कोरोनाची लस वितरित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेली पूर्वतयारी आदी गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत घेतला.
ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे कोणीही बेसावध राहू नये. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी शथीर्चे प्रयत्न करण्याची गरज आहे.
मार्चआधी लस नाही –
मार्च-एप्रिलच्या आधी कोरोना लस विकसित होणे कठीण आहे असेही पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत तज्ज्ञांनी सांगितले.
दोन लसींच्या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात
भारत बायोटेक, आयसीएमआरच्या संयुक्त प्रयत्नातून देशात बनणारी कोव्हॅक्सिन व झायडसकॅडिलाच्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा तर सिरम-अॅस्ट्रोझेनिसा बनवत असलेल्या कोव्हिशिल्ड या लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सध्या सुरू असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली.
रेमडेसिवीरच्या वापरावर बारीक लक्ष
रेमडेसिवीरमुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होतो या गोष्टीत तथ्य नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहीर केल्याने भारतातही रेमडेसिवीरच्या उपयोगाबाबत औषध नियंत्रक यंत्रणा आता बारीक लक्ष ठेवून आहे. रेमडेसिवीर अनेक देशांत अव्वाच्या सव्वा किमतीला विकले जात आहे.