बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वितरित करण्यात आलेला शालेय पूरक पोषण आहार हा निकृष्ट व कुजक्या स्वरूपाचा असून संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी खामगाव ता. बार्शी येथील रवींद्र मुठाळ यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे.
Demand for action against rats in school nutrition in Barshi taluka
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बार्शी शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये सध्या शालेय पूरक पोषण आहार वाटप चालू असून वाटप करण्यात येणाऱ्या आहारामध्ये निकृष्ट आहाराचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे.तसेच वितरित करण्यात आलेला पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा, कुजका अशा स्वरूपात आहे. लहान मुलामुलींना शालेय शिक्षण घेताना मुग डाळ व ईतर आहाराचे वाटप करण्यात आले आहे. मात्र वाटप केलेल्या आहारामध्ये उंदराच्या लेंड्या व इतर मिक्स खराब डाळीचे तुकडे याचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तसेच लाभार्थ्यांना दिलेला हरभरा कुजका असून तो किडलेला आहे. या किडलेल्या सडलेल्या निकृष्ट दर्जाच्या हरभरा व मूग डाळ यामुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच विषबाधाही होऊ शकते. त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.तरी सदर प्रकाराची पूर्ण चौकशी करून सदर चा आहार वाटप बंद करून वाटप आहार पुन्हा परत घेऊन नवीन चांगल्या प्रतीचा उत्कृष्ट आहार सर्व शाळांना वितरित करावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच दोषी असणार यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. याची दखल न घेतल्यास जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनाच्या प्रती बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बार्शी तहसील कार्यालय, जिल्हा परिषद सोलापूर व संबंधितांना देण्यात आले आहेत.
चौकट;- आ.राजेंद्र राऊत, बार्शी
पंचायत समिती अधिका-यांनी निकृष्ट आहार वाटप करणा-या संबंधितास नोटीस देऊन संबंधितावर गुन्हे दाखल करावेत.
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज गावातील सुंदर रस्ते हे गावाचे वैभव असते.त्यामुळेच गावच्या सौंदर्यात भर पडते…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज तालुक्यातील विकास कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीच तडजोड चालणार नाही.निकृष्ठ कामे करणा-यांना नोटीसा…
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज पिंपळगाव (पान) ता.बार्शी येथील जि.प.प्राथमिक शाळेची तिसरीची विद्यार्थीनी कु.सान्वी दत्ताञय गोरे हिने…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युजझोक्याची साडी फाडल्याचा आरोप करत चौघांनी मिळुन दोघाना शिविगाळ करुन काठीने मारहाण…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज ढेंबरेवाडी ता.बार्शी येथे गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. प्रमिला नागटिळक हिने पिंपरी-चिंचवड…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे *विद्वान* होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण संपादन…