June 5, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

माजी मुख्यमंत्र्यांवर भाजपा मोठी जबाबदारी सोपवणार

महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून काम बघत असलेल्या भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपा पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बिहार येथील विधानसभेची निवडणूक जवळ आलेली असून या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपाकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Advertisement

BJP will hand over big responsibilities to former chief ministers

बिहारमध्ये भाजपा पक्षा चे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस काम पाहणार आहेत असे समजते. गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. लवकरच प्रभारीपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

बिहार निवडणूक प्रभारीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा समोर आल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते सी.पी. ठाकूर यांनी याबाबत प्रतिक्रियाही दिली आहे.

Leave a Reply