June 5, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पदोन्नती आरक्षणाचा शासनाने तातडीने निर्णय घ्यावा – रिपाइंचे निवेदन

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी दि. १ जून ते ७ जून पर्यंत रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन सप्ताह जाहिर करण्यात आला आहे. आज बार्शी तहसिलदार यांना रिपाइंच्या वतीने निवेदन देण्यात आले .

Advertisement

Government should take immediate decision on promotion reservation – Ripai’s statement
पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे हे सरकार आरक्षण प्रश्नी दलितांना न्याय देण्या ऐवजी दलित विरोधी सरकार ठरले आहे.
मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी आर पी आयचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांचे नेतृत्वाखाली संपूर्ण सोलापूर शहर, जिल्ह्यात निदर्शने करण्यात येत आहेत. दलित समाजाच्या भावना तहसिलदार यांचे मार्फत शासनापर्यत पोहचाव्यात म्हणून बार्शी शहर व तालुका यांच्यावतीने  बार्शी चे तहसिलदार सुनिल शेरखाने यांना आर पी आय (आठवले गट) बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले .
यावेळी रिपाई चे तालुकाध्यक्ष – दतात्रय क्षिरसागर ,जिल्हा उपाध्यक्ष -विरेंद्र कांबळे ,अॅड. अविनाश गायकवाड (बार्शी शहराध्यक्ष ) पृथ्विराज कदम, (बार्शी शहर उपाध्यक्ष) वैराग शहराध्यक्ष – दिपक लोंढे , तालुका सरचिटणीस – श्रीशैल्य भालशंकर ,विकास बनसोडे ( वैराग ब्लॉक अध्यक्ष ) ,नानासाहेब कांबळे ,अँड. धिरज कांबळे ( युवक बार्शी शहराध्यक्ष) , अमोल कांबळे , (युवक ता.अध्यक्ष ) , रविराज बनसोडे , राहुल थोरात (युवक वैराग शहराध्यक्ष ), राहुल भालशंकर ,विश्वनाथ साबळे, संजय चव्हाण (नाथपंथी डवरी गोसावी जिल्हा अध्यक्ष ) दादा वाळके ,गणेश मोरे (प्रदेशाध्यक्ष नाभिक आघाडी ), चंद्रकांत साबळे, संदिप साबळे ,भाऊ सुर्वे आदी उपस्थित होते .

Leave a Reply