June 5, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पर्यावरण संरक्षण व संवर्धन गरजेचे- प्राचार्य डॉ एस एस गोरे

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ,सांस्कृतिक विभाग व पृथ्वी कुलातर्फे आज शनिवार दि 5 जून 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रम निमित्ताने महाविद्यालयात प्राचार्य डॉ  एस एस गोरे ,विविध विभाग प्रमुख ,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

The need for environmental protection and conservation – Principal Dr. S. S. Gore

यावेळी प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद केले. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हे पर्यावरणाचा समतोल साधतात. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

गतवर्षीच्या 35 वृक्षांचेही उत्कृष्ट संवर्धन करण्यात आले आहे. तसेच महाविद्यालयातील बी एड,बी पी एड, एम एड, एम पी एड अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी साठी पर्यावरण आधारित ऑनलाईन क्विझ आयोजित करण्यात आली. यात 67 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच पर्यावरण महत्व ,पर्यावरण रक्षण काळाची गरज, पर्यावरण आणि आरोग्य पर्यावरण रक्षा जगाची सुरक्षा  ,आपत्ती व्यवस्थापन, आदी विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. महाविद्यालयातर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम अनुक्रमे रु 1000, रु 700 ,रु 500 व रु 200 व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन पृथ्वी कुल प्रमुख डॉ एम एस डिसले व डॉ पी ए पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ भिलेगावकर,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. व्ही. पी. शिखरे , सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply