April 28, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी युवासेनेचे थाळी,ताली बजाव आंदोलन

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड स्पीड

पेट्रोल,डिझेल,गॅस,खाद्यतेल,डाळीच्या दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र शासनाचा निषेध करीत बार्शी युवासेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आज रविवारी थाळी,ताली बजाव आंदोलन करण्यात आले.
देशात पेट्रोल,डिझेल,गॅस,खाद्यतेल,डाळी अशा सर्वच गोष्टींचे दर दररोज वाढत आहेत.सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इंधन दरवाढ करून महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. म्हणून वाढत्या महागाई बद्दल केंद्र सरकार विरोधात थाळी,ताली बजाव वाजवुन आंदोलन करण्यात आले.
युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व  युवा सेना सचिव  वरून सरदेसाई , खा. ओमराजे निंबाळकर,  शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर,  शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बार्शी शहर प्रमुख विजय माने यांच्या मार्गदर्शना खाली हे आंदोलन करण्यात आले.

Barshi Yuvasena’s Thali, Tali Bajaw Andolan
यावेळी  युवासेना बार्शी शहर प्रमुख हेमंत रामगुडे, विद्यार्थी सेना बार्शी तालुका प्रमुख पांडुरंग घोलप, ज्येष्ठ शिवसैनिक चोबे काका,अजय बनसोडे,सागर धालगडे, विक्रम क्षीरसागर, प्रदिप घोडके, दर्शन देशमुख अहमद शेख,निहाल बागवान,योगेश जाधव , सचिन बनसोडे आदि युवा सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply