अशोक माळी यांची संचालक पदी निवड
बार्शी; महाराष्ट्र स्पीड स्पीड
मळेगांव ता.बार्शी येथील सामाजिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक माळी यांची मळेगांव विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक पदी निवड करण्यात आली,या निवडीबद्दल सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्रजी हजारे,सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे,श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक बाळासाहेब माळी,धाराशिव जिल्हा शिवसेना नेते बाळासाहेब दंडनाईक,मोहोळ चे उद्दोजक जयसिंग भानवसे,सावता परिषदेचे बार्शी तालुका अध्यक्ष दिनेश नाळे,सहारा वृद्धआश्रम गौडगांव चे संस्थापक राहुल भड,उद्दोजक राजाभाऊ काळे,सरपंच परिषदेचे शिवशंकर ढवण, पांडुरंग घोलप,आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
मळेगांव येथील ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करून पदाला योग्य न्याय देईल
अशोक माळी(संचालक)
Ashok Mali elected as Director