March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

तरूणीने केली महाविद्यालयीन तरूणाची फसवणूक

बार्शी ;- महाराष्ट्र स्पीड न्युज
ओळखीचा गैरफायदा घेऊन महाविद्यालयीन तरूणाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बोलाऊन घेत त्याच्या दुचाकीवर जबरदस्तीने बसुन त्याला बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची धमकी देत रोख २५ हजार रुपयांची मागणी करत चक्क तरुणीने तरुणालाच फसविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
   याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात तरुणीसह एकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना बार्शी न्यायालयात उभे केले असता ९ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Advertisement

A young girl cheated a college boy

   @नितीन शिंदे वय २८ रा. ढोराळे, ता. बार्शी व तरुणी अशी याबाबत गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
     @निलेश पाटेकर वय १९ रा. तडवळे (या) ता. बार्शी या तरूणाने  फिर्याद दिली आहे.
  तालुक्यातील तडवळे (या) येथील भगवती देवीची यात्रा ५ ऑक्टोबरला होती.तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील तरुणी येथे नाचण्यासाठी आलेल्या होत्या त्यावेळी त्या तरुणीने निलेश पाटेकर याचा मोबाईल नंबर घेतला होता. दरम्यान सदर तरुणीने तरूणाला फोन केला व तू कोठे आहेस अशी चौकशी करून, मी बार्शी येथे आलेली असून तु छत्रपती शिवाजी कॉलेजजवळ ये असे सांगितले.
  त्यानंतर थोड्या वेळाने पाटेकर तेथे पोचल्यावर पुन्हा तरुणीने फोन करुन मी शिवाजी चौकात कुर्डुवाडी रोडवर उभी असून तु तिथे ये असे सांगितले.तेव्हा तरूण तेथे गेला.पाटेकर याने चहा घेऊ असे म्हणताच तरूणीने आपण पुढे धाव्यावर चहा घेऊ असे म्हणुन निलेशच्या दुचाकीवर बसुन त्याला  कुर्डुवाडी रस्त्यावरिल एका लॉजच्या खोलीत नेले.खोलीत तरूणीने अर्धनग्न फोटो काढला.तसेच बाथरुममध्ये जाऊन या तरूणीने हा प्रकार फोन करूण सांगितला.
व बाथरूममधून बाहेर आल्यानंतर तरूणाला २५ हजारांची मागणी करत  पैसे न दिल्यास, अत्याचार केल्याचे सांगेन अशी धमकी दिली.तरूणाच्या बँक खात्यातील ५०० रूपये जबरदस्तीने दुस-या बँक खात्यावर ट्रान्स्फर करूण घेतले.
दरम्यान पोलिस घटनास्थळी आले.तेव्हा तेथे चौकशी करून दोघाना पोलिसात आणण्यात आले.शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply