चिखर्डे येथे पंचक्रोशीतील जनतेचा रस्ता रोको,प्रमुख अधिका-यांची अनुपस्थितीमुळे आंदोलक संतप्त
बार्शी;- महाराष्ट्र स्पीड न्युज
तालुक्यातुन गेलेल्या परांडा – बार्शी – उस्मानाबाद रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करूण ईतर प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावी या मागणीसाठी या मार्गावरील विविध ग्रामपंचायती,शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी बार्शी-उस्मानाबाद रस्त्यावरील चिखर्डे येथे आज मंगळवारी रस्ता रोको आंदोलन करूण सार्वजनिक बांधकाम विभागाचा व ठेकेदाराचा निषेध नोंदवला.
At Chikharde, people block the road in Panchkroshi, protestors are angry because of the absence of key officials.
चिखर्डेचे सरपंच प्रकाश पाटील, सुमंत तुपेरे ,दिनेश लोंढे,शरद भालेकर,जिवन गावडे,आप्पा कोंढारे,बप्पा कोंढारे,शुभाष माळी, जयराम आडगळे यांच्याकडून सपोनी सुधीर तोरडमल,बांधकाम विभागाचे सचिन वासकर,वन विभागाचे ईयुब काजी यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी मोबाईल बंद ठेऊन आंदोलन स्थळी अनुपस्थित राहिल्याने आंदोलक संतप्त झाले होते.बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्यावर वातावरण तणावपूर्ण झाले होते.
तब्बल अडीच तास चाललेल्या या आंदोलनात चिखर्डे, शेलगाव (मा) ,तांदुळवाडी येथील ग्रामस्थांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.दुतर्फा एक किलो मीटर रांगा लागल्या होत्या.
रूंदीकरण मार्गावरील अपूर्ण कामाच्या मागण्याची पुर्तता करावी, सबंधित ठेकेदार,त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी वरिष्ठ यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे मनमानी कारभार करतात. कंपनीकडून ग्रामस्थ व शेतकऱ्यावर दबाव आणून शेतकरी व ग्रामस्थावर अन्याय केला जात आहे. त्या कामाचे वरिष्ठासह कॉलीटी कंन्ट्रोल नी संबंधित कामाची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून रखडलेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी होवून संबंधितावर कारवाई करावी. ठेकेदाराचा परवाना रद्द करूण मुजोर भाषा वापरणा-यांवर कारवाई करावी, सर्वीस रस्ते, गटारीचे पाणी काढावे,शासकिय निकषानुसार कामाची पुर्तता व्हावी,सदर ठेकेदाराची बिले थांबवावी,शेतकऱ्यांना व ग्रामस्थाना शेतात जाणे-येणेसाठी पाईप टाकून देण्यात यावे, बेकायदेशीर होत असलेल्या कामावर जाणीवपूर्वक अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत असल्याने त्याने वेतन व पदोन्नती थांबविण्यांत यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.