सुशांतच्या बहिनीने उचलले हे पाऊल,सुशांतचे चाहते हैराण
मुंबई | गेल्या कित्येक महिन्यांपासून देशात सुशांत प्रकारणानं खळबळ माजवली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनं त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. सुशांतच्या मृ.त्यूचा शोध घेण्यासाठी देशातून अनेकांनी आवाज उठवले. सुरुवातीला मुंबई आणि बिहार पोलीस याप्रकरणी शोध घेत होते. मात्र, सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी अशी देशभरातून मागणी होऊ लागली.
यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सुशांत प्रकरण सोपविलं. गेल्या कित्येक महिन्यांपासून सीबीआय सुशांत प्रकरणी शोध घेत आहे. सुशांत सिंह राजपुतनं आ.त्मह.त्याच केली होती, हे सीबीआयनं स्पष्ट केलं आहे. तरीही अद्याप देखील याप्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत.
अशातच आता सुशांतची बहीण श्वेता कीर्ती सिंहनं मोठं पाऊल उचललं आहे.
सुशांत प्रकरणी सत्य लवकरात लवकर समोर यावं यासाठी सुशांतची बहीण श्वेता कीर्ती सिंहनं ‘जस्टीस फॉर सुशांत’ असं एक कॅम्पेनच सुरू केलं आहे. जगभरातील सुशांतचे चाहते या कॅम्पेनला जोडले गेले आहेत. सोशल मीडियावर हे कॅम्पेन खूप जोरात चालू आहे. मात्र, आता श्वेताच कदाचित यापुढे कोणतीही ऑनलाइन पोस्ट करणार नाही.
सुशांत प्रकरणी सीबीआयनं दिलेल्या निर्णयावर श्वेता नाराज झाली होती. श्वेता सातत्यानं सुशांतची ह.त्या करण्यात आली आहे, असं म्हणत होती. मात्र, सीबीआयनं सुशांतनं आ.त्मह.त्या केली आहे असं सांगितलं आहे. सीबीआयच्या चौकशीवर नाराज झालेल्या श्वेतानं आपलं ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केलं आहे.
श्वेतानं इन्स्टाग्राम आणि ट्विटर बंद का केलं?, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, श्वेता लवकरच तिच्या या निर्णयामागचं कारण अधिकृतपणे सांगेल, अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवाती पासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांत प्रकरणावरून अनेकांनी रियावर आ.रोप केले आहेत. सुशांतच्या कुटुंबाने देखील सुशांतच्या मृ.त्यूचं कारण रिया चक्रवर्ती असल्याचं म्हटलं होतं.
सुशांत प्रकरणी अनेक अ.फवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. सुशांत प्रकरणी खोटे किंवा दिशाभूल करणारी अनेक विधानं करण्यात आली आहेत. सुशांत प्रकरणातील गोष्टी पाहता या सर्व अफवांच्या केंद्रस्थानी रिया चक्रवर्ती असल्याचं लक्षात येतं. मात्र, आता रियाच्या वकिलांनी सुशांत प्रकरणी खोटे आ.रोप करणाऱ्यांना चेतावणी दिली आहे.
रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी रविवारी एक वक्तव्य जारी केलं होतं. मी म्हटलं होतं की, एकदा रिया जामिनावर बाहेर आली तर आम्ही त्या लोकांच्या मागे लागू ज्यांनी रियाला बदनाम केलं आहे. दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी ज्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आधार घेत रियाला टार्गेट केलं त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करू, असं सतीश माने शिंदे यांनी आता म्हटलं आहे.