October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

लज्जास्पद! कोलकत्ता विरुध्दच्या पराभवानंतर धोनीच्या पाच वर्षे वर्षाच्या मुलीला अत्याचाराची धमकी

नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सोशल मीडियावरील असंवेदनशील वापरकर्त्यांनी एमएस धोनीची पाच वर्षांची मुलगी झीवावर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.

क्रिकेट हा भारतासह जगभरात लोकप्रिय खेळ आहे. अनेकजण तर या खेळाचे वेडे असतात. परंतु आता यात विकृती देखील येत असल्याचे दिसून येत आहे. या खेळात अत्यंतिक भावनेने गुंतून गेलेले चाहते आता त्यांची सीमा ओलांडताना दिसत आहेत.

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीनी हा कोलकाता विरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवानंतर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. मात्र, आता त्याच्या मुलीला बलात्काराची धमकी देणे हे लज्जास्पद असल्याचे बोलले जात आहे.

धोनीला ट्रोल करताना युझर्सने त्याची पाच वर्षांची मुलगी झिवावरही हल्ला केला आहे. तसेच तिच्याबद्दल अपमानजनक संदेश लिहीत बलात्काराच्या धमक्या पोस्ट केल्या आहेत.

Leave a Reply