June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

राज्यात व्यायामाला 25 ऑक्टोबर पासुन सुरू

मुंबई –

महाराष्ट्र राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत दसऱ्यापासून म्हणजेच, 25 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ठाकरे म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी करण्यात यावे. स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुम्बा, योगा असे सामुहिक व्यायाम प्रकार एसओपीतील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहतील.

आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. पण युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. अनेक निर्बंध आपण शिथील करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफिलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply