March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मोबाईल असोसिएशनच्या वतीने जिएसटी विरोधात आंदोलन

बार्शी : केंद्र शासनाने जिएसटी मध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय मोबाईल असोसिएशनने तीव्र लढा छेडत मिशन राईट फाॅर फाईट या आंदोलनाला प्रत्येक गाव,  शहर, राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असुन आपला हक्क घेतल्याशिवाय गप्प राहणार नसल्याचे असोसिएशनचे सोलापुर जिल्हा अध्यक्ष धिरज कुंकुलोळ यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश चिंचोळी, सोलापूर जिल्हाध्यक्ष धिरज कुंकुलोळ, उपाध्यक्ष सचिन पत्तेवार, झोन अध्यक्ष गणेश महाडीक, राजन कांबळे, सोमनाथ खरे, सचिव शशिकांत सादिगले, हर्षवर्धन दोशी, प्रफुल्ल सादिगले आदींनी यामध्ये सहभाग घेतला.

Advertisement

कोरोनाचा वाढता कहर, त्यात मोबाईलचा GST 12% वरून एप्रिल पासून 18% करण्यात आला, काही मोबाईल ब्रँड जाणूनबुजून मोबाईल रिटेल मार्केट उध्वस्त करू पाहात आहेत, मार्केटमध्ये अगोदर मंदी होतीच, त्यात अजून या गोष्टींची भर पडली कंपनीवाले दुहेरी नैतिकता ठेवून वागत आहेत, जाणूनबुजून रिटेल मार्केटला स्टॉक न देणे, नवीन जे मॉडेल्स येत आहेत ते पण मेंनलाईन रिटेलर्सना न देता ऑनलाईनला देत आहेत, ऑनलाईनचे महत्व वाढवण्यासाठी मेंनलाईन रिटेलर्सना वाढीव रेटने स्टॉक देतात, त्यामुळे वर्षानुवर्षे ज्यांनी दुकान लावले आहे त्यांनी बंद करावे का ?
ऑनलाईनला स्वस्तात मॉडेल देणे, अवाजवी स्पेशल ऑफर्स देणे, तिथे जे मॉडेल असेल ते मार्केट मध्ये न देणे असे नानाप्रकार करून ऑनलाईनकडे ग्राहक वळवण्याचे षडयंत्र सुरू आहे, यामुळे दिवसेंदिवस ऑनलाईनचा सेलचा आकडा वाढत चाललाय, जे पूर्वाकाळ पासून चालत आलाय तो ट्रॅडिशनल व्यवसाय कमी कमी होत आहे, असेच कायम होत राहिले तर व्यापारी वर्ग देशोधडीला लागण्यास वेळ लागणार नाही, त्यामुळे त्यांच्यावर आधारीत लाखो लोक त्रासात पडतील त्यांच्या पुढे कमाईचे साधन उरणार नाही, सोलापुरात इंडस्ट्री नाहीत त्यामुळे बराच वर्ग खाजगी नोकरीवर अवलंबून आहे, जर आता हेच खाजगी व्यवसाय त्रासात पडले तर त्यांच्या नोकऱ्या पण टिकणे मुश्किल होईल, इमाने इतबारे सर्व प्रकारचे टॅक्स भरून पण व्यापारी जगावे का मरावे आशा स्थितीत आहे, चोर सोडून संन्याशाला फाशी म्हणतात त्यात काही खोटे नाही.या  वागणुकीचा सोलापूर जिल्हा व शहर मोबाईल असोसिएशनकडून धिक्कार करण्यात आला.

Leave a Reply

disawar satta king