February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढणार;हवामान खात्याचा अंदाज

मुंबई । राज्यात यावर्षी सरासरीच्या दरम्यान पावसाची नोंद झाली. प्रदूषणात मोठी घट झाल्याने चांगला पाऊस यावर्षी पडला आता परतीच्या पावसाकडे आता लक्ष लागले आहे.

हवामानातील बदलामुळे परतीचा मान्सून अद्यापही महाराष्ट्रात दाखल झाला नाही. आता ९ ऑक्टोबर दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत १० ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे.

परतीचा मान्सून वेळेवर दाखल झाला नसल्याने हा पाऊस होणार आहे. हा पाऊस पुढील एक आठवडा राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ८ आणि ९ आक्टोबर रोजी मुंबई ढगाळ वातावरण राहणार आहे.

तसेच तापमान ३३ अंशाच्या आसपास राहील.

परतीचा मान्सून अद्यापही मुंबई आणि पुण्यात दाखल झाला नाही. त्याला विलंब झाल्याने हा पाऊस हेण्याची शक्यता आहे. नागपुरात देखील परतीचा पाऊस उशिरा दाखल होणार आहे. राजस्थानतून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून अद्यापही महाराष्ट्रात दाखल झाला नाही.

15 ऑक्टोबरनंतर परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर परतीच्या मान्सूनचा प्रवास मुंबईतून देखील सुरु होईल. यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आता परतीचा पाऊस किती दिवस पडणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply