June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जगदाळे मामा हाॅस्पीटलला 25 लाखांचा धनादेश

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी, यांच्या तर्फे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा युनिट व आय.सी.सी.यु. युनिटला 25 लाख रूपयांचा देणगी धनादेश देण्यात आला.
  हा देणगी धनादेश दिल्याबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांचे आभार व्यक्त करून, जेष्ठ साहित्यिक व साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व संस्थेचे माजी विद्यार्थी रणवीर राऊत यांचेही आभार व्यक्त करून गौरव करण्यात आला.
  यावेळी जगदाळे मामा हॉस्पिटलला देणगी देणा-या बाजार समितीचे सर्व संचालक, दि. बार्शी मर्चंट असोसिएशन, व व्यापारी बांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले.
   यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, डॉ. प्रकाश बुरगुटे, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे मालक, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अरूण  बारबोले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, बाजार समितीचे सर्व संचालक, व्यापारी बांधव उपस्थित होते.

Leave a Reply