पुराच्या प्रवाहाच्या पाण्यात वाहून गेलेल्या दादाराव चौधरी यांच्या कुटूंबाची तहसीलदार प्रदीप शेलार यांनी घेतली भेट
सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज
१४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दादा मारुती चौधरी या तरुणाचा तेरा दिवस झाले तरी अद्याप शोध लागलेला नाही, याबाबत ताबडतोब तपास कार्य सुरू करून शोध लावला जावा आणि सदर कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सहजीवन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
आज बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांनी स्वतः चौधरी यांचे घरी जाऊन त्यांची विचारपुस केली आणि त्यांना धीर देऊन सांत्वन केले. तसेच शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देणार असल्याचेही सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे, सचिव ऍड. सुहास कांबळे, आकाश दळवी, जाणीव फाउंडेशनचे आप्पासाहेब साळुंके पत्रकार सोमनाथ शेवकर, दयानंद पिंगळे आदी उपस्थित होते.
शहरातील तुळजापूर नाक्या जवळील असलेल्या फपाळवाटी या रस्त्यावरील असलेल्या पुलावरून हा तरुण वाहून गेला आहे, सदर दादा चौधरी वय ३२ वर्ष हा मार्केट यार्डात तोलार म्हणून काम करत होता. त्याच्या राणा कॉलनी येथील घराकडे जात असताना वाहून गेला आहे. त्याचे कुटुंबात वृद्ध आई-वडील व पत्नी आहेत.