December 1, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरीच्या शिवछत्रपती विद्यामंदिर प्रशालेत जागतिक महिला दिन साजरा

बार्शी ;

पांगरी ता. बार्शी येथील शिवछत्रपती विद्यामंदिर प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना डोके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पांगरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर तोरडमल,हवालदार सौ. सानप, एकंबे आदी उपस्थित होते.
  प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या पारंपारिक वेशभूषेत उपस्थित आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत मनोगत स्त्री जीवनाचे महत्व विशद केले
सपोनी सुधीर तोरडमल यांनी स्त्रियांच्या कतृत्वाविषयी माहिती दिली मुख्याध्यापिका डोके यांनी मुलींना प्रोत्साहनपर भाषण केले.कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.

Leave a Reply