October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दिनेश कार्तीक कर्णधार पदावरूण पाय उतार;माॅर्गन कोलकत्ताचा नवा कर्णधार

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाचा दिनेश कार्तिकने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ओएन मॉर्गन कोलकाताचा नवीन कर्णधार असेल. याबद्दल शुक्रवारी(१६ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स संघाने माहिती दिली आहे. कार्तिक २०१८ च्या आयपीएल हंगामापासून कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करत होता.

कोलकाताने आयपीएलच्या १३ व्या हंगामात आत्तापर्यंत कार्तिकच्या नेतृत्वाखाली ७ सामने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ३ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या ७ सामन्यांनंतर कार्तिकने फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नेतृत्वाची जबाबदारी कोलकाताने विश्वचषक विजेता इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनवर सोपवली आहे.

याबद्दल कोलकाताचे सीइओ वेंकी म्हैसूर यांनी म्हटले आहे की ‘कार्तिकसारखा कर्णधार लाभणे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट होती. असा काही निर्णय घेण्यासाठी मोठे धैर्य लागते, जे त्याने दाखवले. आम्हीही त्याच्या निर्णयाने आश्चर्यचकीत झालो आहोत, पण आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो. २०१९ विश्वचषक विजेता कर्णधार ओएन मॉर्गन, जो कोलकाताचा उपकर्णधार होता, तो आता संघाचे नेतृत्व करणार असल्यानेही आम्ही आनंदी आहोत. कार्तिक आणि मॉर्गन यांनी या स्पर्धेत एकत्र चांगले काम केले आहे. आम्हाला आशा आहे की हा बदल आमच्यासाठी योग्य ठरेल.’

Leave a Reply