June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जुनी पेन्शन हक्क संघटना बार्शीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री महोदयासमवेत कात्री तुळजापूर येथे भेट

उस्मानाबाद;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

अतिवृष्टीमुळे झालेल्या अपरिमित हानीमध्ये शेतकरी बांधवांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कात्री तुळजापूर येथे  दिनांक 21 आँक्टोबर रोजी भेट दिली.

जुनी पेन्शन हक्क संघटना सोलापूरच्या वतीने DCPS धारकांचे शासनाकडे जमा असलेली रक्कम शेतकऱ्यांसाठी वापरून त्याबदल्यात कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आग्रही मागणी केली मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ या निवेदनाची दखल घेऊन मिलिंद नार्वेकरांना जुनी पेन्शन संघटना सोलापूरच्या निवेदनाची दखल घेण्यास सांगितले व मिलिंद नार्वेकरांनी श्री. मोहन पवार यांच्याकडून संघटनेची आतापर्यंतची निवेदने पेपरमधील बातम्या कात्रणे याचे सविस्तर वाचन करून लवकरच जुनी पेन्शन संघटनेच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे चर्चेसाठी बोलावतो असे आश्वासन दिले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,मंत्री संदीपान भुमरे,पालकमंत्री शंकरराव गडाख खासदार ओमराजे निंबाळकर आ. कैलास पाटील उपस्थित होते.

निवेदन देताना जुन्या पेन्शनचे मोहण पवार, बार्शीचे  सरचिटणीस प्रवीण देशमुख, संदीप गायकवाड ,बंडू गोरे ,विश्वनाथ ढाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बार्शीचे चित्रकार महेश मस्के यांनी तयार केलेले स्केच देऊन जुनी पेन्शन संघटना बार्शीतर्फे मुख्यमंत्र्यांचा  सत्कार केला.


Leave a Reply