March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जिप सदस्या सौ रेखाताई राउत आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित

बार्शी ;

महाराष्ट्र राज्य मुंबई, सरपंच परिषद यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पांगरी ता. बार्शी येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रेखाताई राऊत यांचा आदर्श जि. प.सदस्या महिला पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील,सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस विकास जाधव उपस्थित होते.

चंचल पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या की महिला पदाधिकारी चांगल्या पद्धतीने कारभार चालवतात त्यांच्या पाठीशी अजून दोन हात खंबीरपणे साथ देत असतात दोनचे चार हात करून त्या काम करतात त्यामुळे त्या भागात गावाचा विकास नक्की होतो.महिला पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील लोकांच्या गरजा ओळखून त्या दर्जा पूर्तीसाठी मनापासून प्रयत्न करावे.

Leave a Reply