March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचार

🎯 सर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही. नाका-तोंडाद्वारे फेस गळतो, दंशाची जागा काळी-निळी होते. तातडीने लक्षणे तपासून उपचार करावेत.

🐍 इलेपाईन्स
या गटातील साप त्यांच्या विषाद्वारे माणूस आणि जनावरांच्या मेंदू आणि चेता संस्थेवर परिणाम करतात. उदा. नाग, मण्यार

🐍 व्हायपराईन्स
या गटातील साप त्यांच्या विषाद्वारे माणूस आणि जनावरांच्या हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करतात. उदा. फुरसे,घोणस

🐍 जनावरातील सर्पदंश
जनावरे चरताना पाय,सड,कास आणि तोंडाला सर्पदंश होण्याची शक्यता असते.

🎯 साप दंश करून त्यांच्या विशिष्ट ग्रंथीतून विष जनावरांच्या शरीरात सोडतात.

📌 दंश झालेल्या जागेतून विष रक्तात मिसळते आणि विषारी परिणाम दिसू लागतो.
विषाचा परिणाम हा जनावरांचे आकारमान, दंश केलेली जागा( मेंदू आणि हृदयाच्या किती अंतरावर आहे), विषाची मात्रा यावर अवलंबून असतो.

🐍 सर्पदंशाची लक्षणे नाग, मण्यार चावल्यास दिसणारी लक्षणे

📍 मेंदू व चेतासंस्थेवर परिणाम होतो.
📍 दंशाची जागा सुजून वेदनादायक बनते. स्नायू कमजोर होऊन जनावर उभे राहू शकत नाही.
📍 चारा खाण्यास त्रास होतो किंवा खाल्लेला चारा तोंडातच राहतो.
📍 पोटातील वेदनेमुळे जनावर विव्हळते.
📍 डोळ्यांच्या बुभुळांचा आकार वाढतो.
📍 अंग थरथरते, जनावर जास्त प्रमाणात लाळ गाळते.
📍 श्वसन संस्थेच्या अर्धांगवायूमुळे जनावर दगावते.

🐍 घोणस, फुरसे चावल्यास दिसणारी लक्षणे

📍 हृदय व रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.
दंशाची जागा चिघळून वेदनादायक बनते.
📍 दंशाची जागा काळी निळी पडते.
📍 जखमेतून रक्तासारखा चिकट द्रव पडू लागतो.
कातडी थंड पडून जनावर प्रतिसाद देत नाही.
📍 अतिसार, उलट्या, फुफुसाचा दाह होतो.
📍 रक्ताभिसरण बंद पडून जनावर दगावते.
📍 जनावर वाचल्यास दंशाची जखम चिघळून जंतू संसर्ग होऊन धनुर्वात होण्याची शक्यता असते.

🐍 सर्पदंश कसा ओळखाल ?
📍 सापाच्या दातांच्या खुणा शरीरावर असतात. दंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही.
📍 सतत ओरडते, नाका-तोंडा द्वारे फेस गाळते,दंशाची जागा काळी-निळी होते,त्या जागेतून रक्त आणि पिवळसर रंगाचा चिकट स्राव येतो.जनावर लंगडते. भूक मंदावते. उपचार न झाल्यास जनावर दगावते.

🐍 प्राथमिक उपचार

📍 सर्पदंश झाल्यास उपचारासाठी तात्काळ पशुवैद्यकास बोलवावे.
📍 ज्या सापाने दंश केला आहे, त्याचे तोंड ठेचू नये कारण तोंडाच्या रचनेवरून साप कोणत्या प्रजातीत मोडतो ( विषारी/ बिनविषारी ) याची कल्पना येते. त्यामुळे उपचार करणे सुलभ जाते.
📍 जनावरास शांत व स्वच्छ ठिकाणी बांधावे.
📍 दंशाची जागा स्वच्छ पाण्याने आणि जंतुनाशकाने धुवावी.
📍 दंशाच्या जागेची हालचाल कमी करावी, जेणेकरून विष शरीरात गतीने पसरत नाही.
📍 विषाचा शरीरातील प्रसार कमी करण्यासाठी जखमेच्या वर काही अंतरावर दोरी किंवा कापड बांधावे. बांधलेले कापड १० मिनिटाच्या अंतराने काही सेकंदासाठी सैल करावे.

🐍 या गोष्टी टाळाव्यात
📍 दंशाची जागा चाकू किंवा धारदार शस्त्राने पसरवू नये.
📍 त्यामुळे जंतुसंसर्ग आणि धनुर्वात होण्याची शक्यता असते.
📍 जखमेवर तंबाखू लावू नये. या गोष्टी लावल्याने धमण्यांची तोंडे मोठी होतात. विष अधिकच भिनत जाते.

🐍 सर्पदंश टाळण्याचे उपाय

📍 गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. गोठ्या भोवताली अडगळ असू नये.
📍 धान्याचे कोठार आणि गोठा यामध्ये अंतर असावे.
📍 गोठ्याच्या परिसरातील उंदीर,घूस यांचा प्रादुर्भाव कमी करावा.

Leave a Reply