June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

गुळपोळीचा गावठाण डिपी पंधरा  दिवसांपासून बंद,दलित वस्ती अंधारात

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

गुळपोळी ता.बार्शी येथील पंधरा दिवसांपासून बंद असलेला गावठाण  डी पी तात्काळ  दुरुस्ती करावा अन्यथा आंदोलन करण्याचा ईषारा गुळपोळीतील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
बार्शीतील विज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता ग्रामीण उपविभाग याना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की गत 15 दिवस गावठाण डी पी (दलित वस्ती) बंद असल्यामुळे लोकांना अंधारात राहावे लागत आहे यांचा सामान्य लोकांना त्रास होत आहे .गावठाण येथील लाईट सुरळीत करण्यात यावी .अन्यथा संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
  त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी,  नितीन पाटील, किरण खुरंगळे , तुषार बारवकर,विश्वनाथ बारवकर , नितीन सरवदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply